खिर्डी येथे दारुबंदी करणाºया महिलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 05:52 PM2017-10-09T17:52:20+5:302017-10-09T17:53:02+5:30
पाल येथील वृंदावन आश्रमात साडी-चोळी देऊन केला सन्मान
आॅनलाईन लोकमत
पाल, ता.रावेर,दि.९ : वृंदावनधाम आश्रमात गादीपती गोपाल चैतन्य महाराज यांच्या हस्ते खिर्डी येथे दारुबंदी करणाºया महिलांचा सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय चैतन्य साधक परीवारातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. जिन्सी येथील साधक रमेश पवार यांच्याकडून साडी भेट देण्यात आली.
या आश्रमची स्थापना पू. संत लक्ष्मण बापू यांनी केली आहे. त्यांनी व्यसनमुक्तीच्या कार्यावर आपले लक्ष केंद्रीत केले होते. त्याचाच परीणाम म्हणून या भागातील अनेक व्यसनापासून दूर असल्याची भावना गोपाल चैतन्य महाराज यांनी व्यक्त केली. रसलपूर येथील भगवान, सोपान, शहाणे आदी उपस्थित होते.