अडीच वर्षापूर्वी हरविलेली महिला आधारकार्डमुळे सापडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 07:43 PM2018-07-20T19:43:42+5:302018-07-20T19:47:09+5:30
धुळे येथे नातेवाईकाकडे लग्नाला जात असताना सुरत रेल्वे स्थानकावरुन चुकून दुसऱ्या रेल्वे गाडीत बसल्याने तिरुअनंतपुरम (केरळ) येथे पोहचलेल्या लक्ष्मीबाई कृष्णराव पानपाटील (वय ८२, रा.मारवड, ता.पाचोरा, ह.मु.सुरत) या तब्बल दोन वर्ष सात महिन्यानंतर गवसल्या.
जळगाव : धुळे येथे नातेवाईकाकडे लग्नाला जात असताना सुरत रेल्वे स्थानकावरुन चुकून दुसऱ्या रेल्वे गाडीत बसल्याने तिरुअनंतपुरम (केरळ) येथे पोहचलेल्या लक्ष्मीबाई कृष्णराव पानपाटील (वय ८२, रा.मारवड, ता.पाचोरा, ह.मु.सुरत) या तब्बल दोन वर्ष सात महिन्यानंतर गवसल्या. लक्ष्मीबाई या ब्रिटीश काळातील लोकल बोर्डाचे सदस्य कृष्णराव मुकूंदराव पानपाटील यांच्या पत्नी आहेत. लक्ष्मीबाई यांना कुटुंबापर्यंत पोहचविण्यासाठी आधारकार्ड व विधी सेवा प्राधिकरण हे दोन माध्यम महत्वाचे ठरले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, धुळे येथे २२ एप्रिल २०१६ रोजी नातेवाईकाकडे लग्न असल्याने लक्ष्मीबाई या धुळे येथे येण्यासाठी आदल्या दिवशी सुरत रेल्वे स्थानकावर आल्या. लक्ष्मीबाई या चुकून भुसावळऐवजी तिरुअनंतपुरम जाणाºया गाडीत बसल्या. दुसºया दिवशी तेथे उतरल्यानंतर त्यांना अनोळखी शहर दिसले तसेच भाषाही अवगत नव्हती. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली. रेल्वे स्टेशनवरच मिळेल ते खाऊन त्यांनी काही दिवस काढले. त्यानंतर तेथे विधी सेवा प्राधिकरणात काम करणाºया एका समाजसेविका भेटल्या. त्यांनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली, मात्र भाषेच्या अडचणीमुळे त्यांचाही नाईलाज झाला. त्यामुळे त्यांनी तेथील महिला निरीक्षणगृहात त्यांना दाखल केले होते. त्यानंतर आधारकार्डवरून त्यांची ओळख पटली होती.