दुचाकीच्या धक्क्याने महिला बेशुद्ध

By admin | Published: February 12, 2017 01:01 AM2017-02-12T01:01:03+5:302017-02-12T01:01:03+5:30

सुदैवाने बचावली : जिल्हापेठ पोलीस स्टेशनसमोरुन जाणाºया एस.टी.बसेस रोखल्या

Female unconscious by two wheelers | दुचाकीच्या धक्क्याने महिला बेशुद्ध

दुचाकीच्या धक्क्याने महिला बेशुद्ध

Next

जळगाव : शेजारी चालणाºया दुचाकीचा धक्का लागल्याने दुसºया दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडल्याने  डोक्याला मार बसून त्या बेशुध्द पडल्याची घटना शनिवारी संध्याकाळी सात वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशनसमोर घडली. या महिलेला शेजारीच असलेल्या दवाखान्यात नेण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची सुटका झाली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप शिरसाठ (रा.वाघ नगर, जळगाव) हे पत्नी वैशाली यांच्यासह शहरातून काम आटोपून घराकडे जात असताना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या समोरच त्यांच्या शेजारीच चालणाºया नरेंद्र फकीरा गोवीनीकर (रा.पिंप्राळा, हुडको)  यांच्या दुचाकीचा शिरसाठ यांच्या दुचाकीला धक्का लागला. त्यामुळे वैशाली शिरसाठ यांची साडी दुचाकीच्या चाकात अडकल्याने त्या खाली कोसळल्या.
डोक्याला मार लागल्याने त्यांची शुध्द हरपली होती. यावेळी पोलीस स्टेशनच्या बाहेरच थांबलेले उपनिरीक्षक गजानन राठोड, महेंद्र बागुल व सुधीर चौधरी या तिघांनी तातडीने तेथे जावून महिलेला सावरले. पाणी पाजल्यानंतर काही वेळाने शिरसाठ या शुध्दीवर आल्या. त्यानंतर त्यांना दवाखान्यात रवाना केले.

बस चालकाला सुनावले
बहिणाबाई उद्यान व भास्कर मार्केट परिसरातून अवजड वाहनांना बंदी असतानाही एस.टी.बस या रस्त्याने जात असल्याने उपनिरीक्षक गजानन राठोड यांनी जळगाव आगाराची बस थांबवून चालकाला कडक शब्दात सुनावले. या मार्गावरुन बस आली तर दंडात्मक कारवाई न करता पोलीस स्टेशनला जमा करण्याचा इशारा दिला. भविष्यात चूक होणार नसल्याची चालकाने हमी दिल्यानंतर बस सोडण्यात आली. अवजड वाहनांमुळे किरकोळ अपघात व वाहतुकीची कोंडी होत असल्याने आगार प्रमुखांना सोमवारी पत्र दिले जाणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

Web Title: Female unconscious by two wheelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.