निकृष्ट जेवणामुळे उमवितील आदिवासी वसतिगृहात मुलींचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 09:46 PM2017-09-24T21:46:33+5:302017-09-24T21:51:21+5:30
उमवि परिसरातील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात देण्यात येणारे जेवण निकृृष्ट दर्ज्याचे मिळत असल्याने वसतिगृहातील सुमारे १२० विद्यार्थिनींनी वसतिगृह प्रशासनाच्या निषेध करीत रविवारी उपोषण केले.
आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.२४- उमवि परिसरातील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतिगृहात देण्यात येणारे जेवण निकृृष्ट दर्ज्याचे मिळत असल्याने वसतिगृहातील सुमारे १२० विद्यार्थिनींनी वसतिगृह प्रशासनाच्या निषेध करीत रविवारी उपोषण केले. प्रकल्प प्रमुख जो पर्यंत समस्या ऐकून घेणार नाहीत तोवर उपोषण सुरु ठेवण्याची भूमिका विद्यार्थिनींनी घेतली. त्यामुळे दुपारी १ वाजेच्या सुमारास यावल येथील प्रकल्प अधिकारी आर.बी.हिवाळे यांनी वसतिगृहात येवून मुलींच्या समस्या ऐकून घेत, महिनाभरात सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मुलींनी आपले उपोषण मागे घेतले.
नाश्ता व जेवणावर बहिष्कार
विद्यार्थिनींनी वसतिगृहातील समस्यांबाबत वेळोवेळी तक्रार करून देखील वसतिगृह प्रशासन याबाबत दखल घेत नसल्याने, वसतिगृहातील १२० मुलींनी सकाळचा नाश्ता व जेवण घेतले नाही. तसेच जोे पर्यंत समस्या मार्गी लावगणार तोवर उपोषण सुरु ठेवण्याचा भूमिका घेतली. त्यामुळे गृहपाल जाधव यांनी विद्यार्थिनींशी चर्चा करून उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. मात्र विद्यार्थिनींनी प्रकल्प अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतरच उपोषण मागे घेवू अशी भूमिका घेतली. त्यामुळे वसतिगृहातील सुमारे १२० विद्यार्थिनींनी मेसमध्ये बसून उपोषण पुकारले.
इन्फो-
ठेकेदार बदलून देण्याची मागणी
वसतिगृहाच्या मेसमध्ये मिळणाºया जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट असून, यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार कुठल्याही सुविधा वसतिगृहात उपलब्ध होत नसल्याची तक्रार मुलींनी केली. जेवण बनविणाºया ठेकेदाराला बदलून देण्याची मागणी विद्यार्थिनींनी केली. पाण्याच्या टाक्यामध्ये जंतू असून, वसतिगृहात वॉटर फिल्टर नसल्याची माहिती येथील विद्यार्थिनींनी दिली. तसेच वसतिगृहात सफाई कामगार व कर्मचारी महिलाच असायला पाहिजेत अशी मागणी देखील विद्यार्थिनींनी केली.
इन्फो-
उपोषण मागे घेण्यास विद्यार्थिनींचा नकार
उपोषण सोडण्यास विद्यार्थिनींनी नकार दिल्यामुळे येथील गृहपालांनी प्र्रकल्प अधिकारी आर.बी.हिवाळे यांना याबाबतची माहिंती दिल्यानंतर, हिवाळे यांनी दुपारी १ वाजेच्या सुमारास वसतिगृहाला भेट देवून मुलींच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच सर्व समस्या या महिनाभरात मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर विद्यार्थिनींनी आपले आंदोलन मागे घेतले. मात्र महिनाभरात समस्या मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विद्यार्थिनींनी दिला.