संकलित निर्माल्याचे पालिका करणार खत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:21+5:302021-09-22T04:18:21+5:30
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता गणेश मूर्तींचे विसर्जन करता यावे. यासाठी पालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी मूर्तींचे संकलन केले गेले. ...
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करता गणेश मूर्तींचे विसर्जन करता यावे. यासाठी पालिकेमार्फत शहरात ठिकठिकाणी मूर्तींचे संकलन केले गेले. विविध भागात एक टन निर्माल्य संकलित झाले. न. पा.ने यासाठी दीडशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती.
संकलित झालेल्या एक टन निर्माल्याचे खत तयार करण्यात येणार आहे. शहरात पालिकेमार्फत प्रथमच असे अभियान राबविण्यात आल्याने पर्यावरणप्रेमींनी समाधान व्यक्त केले.
उपमुख्याधिकारी स्नेहल फडतरे, आरोग्य निरीक्षक संजय गोयर यांच्यासह दिलीप चौधरी, दिनेश जाधव, राहुल निकम, भूपेंद्र राजपूत, भूषण लाटे, कुणाल कोष्टी, कुणाल महाले, जितेंद्र जाधव, योगेश मांडोळे, महेश मोरे, प्रशांत पाटील, रवींद्र पाटील, विरेंद्र पाटील, शामकांत नेरकर यांनी मूर्तींचे संकलन व विसर्जन प्रक्रिया चोखपणे पार पाडली. मूर्ती व निर्माल्य संकलनासाठी माजी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी यांनी वाहनांची व्यवस्था उपलब्ध करुन दिली होती.