जामनेरमधील ग्रामीण भागात लसीकरणाचा महाउत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:22 AM2021-08-24T04:22:19+5:302021-08-24T04:22:19+5:30

जामनेर : तालुक्यात आरोग्य यंत्रणेने शुक्रवारी एकाच दिवशी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ हजार ३८० नागरिकांचे लसीकरण ...

Festival of Vaccination in rural areas of Jamner | जामनेरमधील ग्रामीण भागात लसीकरणाचा महाउत्सव

जामनेरमधील ग्रामीण भागात लसीकरणाचा महाउत्सव

Next

जामनेर : तालुक्यात आरोग्य यंत्रणेने शुक्रवारी एकाच दिवशी ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ हजार ३८० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. लसीकरणातील हा उच्चांक आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय झालेले लसीकरण असे : नेरी -१०२०, फत्तेपूर- ५००, शेंदुर्णी - ५००, वाकोद - ४४०, वाकडी- ३२०, गारखेडा- ३२०, बेटावद-३००.

वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची कर्तव्य तत्परता, उपकेंद्रातील अधिकाऱ्यांनी घेतलेली मेहनत तसेच नागरिकांशी असलेला सुसंवाद व ग्रामपंचायतीचे अनमोल सहकार्य, यामुळे लसीकरणाचा उच्चांक गाठता आला.

-डॉ. राजेश सोनवणे, तालुका वैद्यकीय अधिकारी

कोव्हिशिल्ड

पहिला डोस

४९५०९

दुसरा डोस

१५३५५

कोव्हॅक्सिन

पहिला डोस ४५३४

दुसरा डोस २८९

एकूण

७२२९४

जिल्हास्तरावरून कोरोना लस मिळाल्यानंतर तत्काळ उपकेंद्र स्तरापर्यंत पोहचवून त्याचदिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून लस उपयोगात आणली जाते. पाचशे व पाचशे ते १ हजार लोकसंख्या असणाऱ्या गावांचे प्राधान्याने लसीकरण पूर्ण केले जात आहे.

ज्यांचा पहिला डोस झाला आहे व दुसरा डोस घेणे बाकी असलेले गरोदर माता, स्तनदा माता, जेष्ठ नागरिक, दिव्यांग अशांना आरोग्य विभागाच्या वतीने प्राधान्याने डोस देण्यात येईल, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी सांगितले.

230821\23jal_5_23082021_12.jpg

खादगाव (ता.जामनेर) उपकेंद्रावर लसीकरणासाठी थांबलेल्या महिला.

Web Title: Festival of Vaccination in rural areas of Jamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.