निषेध मोर्चाने दणाणले फैजपूर

By admin | Published: January 17, 2017 12:17 AM2017-01-17T00:17:48+5:302017-01-17T00:17:48+5:30

यावल, रावेर, फैजपुरातील समाज बांधव एकवटले : वनखेड प्रकरणातील आरोपीस फासावर द्या

Festivals of Festivals | निषेध मोर्चाने दणाणले फैजपूर

निषेध मोर्चाने दणाणले फैजपूर

Next

फैजपूर : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील वनखेड येथील अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शहरात वाल्मीक मेहतर समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चाने शहर चांगलेच दणाणले.
गेल्या 15 डिसेंबर 2016 रोजी    मागासवर्गीय मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती. यातील आरोपीस कठोर शासन करण्याची मागणी सावदा येथे वाल्मीक मेहतर समाजातर्फे काढण्यात आलेल्या मोर्चेक:यांनी केली.
 दरम्यान याच  घटनेच्या निषेधार्थ    रावेर आणि  यावल तालुक्यातील मेहतर समाज बांधवांनी   मूक मोर्चाचे आयोजन केले होते. फैजपूर येथील रामदेवबाबा नगर मेहतर कॉलनी येथून दुपारी 1 वाजता या मोर्चास सुरुवात झाली़ यात समाजातील महिलांचा सहभाग लक्षणीय होता.   मोर्चा सुभाष चौक बसस्थानकमार्गे उपविभागीय  कार्यालयावर धडकला़ येथे त्यांनी अत्याचार प्रकरणातील आरोपीस कठोर शासन व्हावे. त्यास फाशी द्यावी, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालून लवकर निकाल द्यावा, अश्या घटना घडू नये म्हणून अॅट्रासिटी कायदा अधिक कडक करावा अशा विविध  मागण्यांचे निवेदन  प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांना देण्यात आले. रावेरचे नायब तहसीलदार धनगर यांनी निवेदन स्वीकारले.
 मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसच्या महिला प्रदेश सरचिटणीस   भुसावळ येथील  अनिता अनिलकुमार खरारे   यांनी केले. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त राखला.  (वार्ताहर)
यांचा होता मोर्चात सहभाग..
 प्रसंगी मेहतर समाजाचे रावेर आणि यावल तालुकाध्यक्ष शंकर दरी, सावखेडा, वासुदेव खराले, रावेर, कमल घारू, यावल, रमेशजी करोसिया, सावदा, कन्हैया आदिवाल, मस्कावद, संजय रल, फैजपूर, किशोर  जावा निभोरा, अमोल निबोळ नगरसेवक फैजपूर यांच्यासह रावेर, यावल तालुक्यातील मेहतर समाज बांधव मोठय़ा संख्येने उपस्थित होते.  मोर्चात समाजातील महिलांची संख्यादेखील मोठी लक्षणीय होती. मोर्चा शांतेतेने प्रांत कार्यालयात जाऊन तेथे निवेदन सादर करण्यात आले.

Web Title: Festivals of Festivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.