वर्डी येथे तापरोग सर्व्हेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 10:04 PM2019-08-21T22:04:32+5:302019-08-21T22:04:42+5:30
वर्डी,ता.चोपडा : येथे जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आरोग्य उपकेंद्र-वडगाव बुद्रूक अंतर्गत वविविध आजारांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. वैद्यकीय ...
वर्डी,ता.चोपडा : येथे जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आरोग्य उपकेंद्र-वडगाव बुद्रूक अंतर्गत वविविध आजारांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णुप्रसाद दायमा यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य केंद्राअंतर्गतपरिसरात डेंग्यू, चिकूनगुनिया, मलेरियासारख्या आजरांपासून संरक्षण करण्याच्या उद्देशा जलद तापरोग सर्वेक्षण द्वारे तापाच्या रुग्णांचा शोध घेतला. तसेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. घरोघरी साठवलेल्या पाण्यातील डास-अळ्या शोधून त्यांना नष्ट करण्यात आले.
आरोग्य सेवक विजय देशमुख, आरोग्य विस्तार अधिकारी सुशील सोनवणे, आरोग्य पर्यवेक्षक दिलीप मराठे, दिलावरसिंग आदींनी परिश्रम घेतले.