विज्ञान क्षेत्रात चोपड्याचा झेंडा सातासमुद्रापार फडकविणारे प्रा.डॉ.पी.एस. लोहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 10:53 PM2020-02-27T22:53:47+5:302020-02-27T22:55:43+5:30
कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रकाश लोहार यांनी सेवेत असताना भारताबाहेर आणि भारतात विविध प्रांतात प्राणीशास्र विषयाच्या विविध परिषदांमध्ये त्यांच्या कामाचा ठसा उमटविला आहे.
संजय सोनवणे
चोपडा : कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रकाश लोहार हे प्राणीशास्र विभागात अनेक वर्षांपासून सेवेत आहेत. त्यांनी सेवेत असताना भारताबाहेर आणि भारतात विविध प्रांतात प्राणीशास्र विषयाच्या विविध परिषदांमध्ये त्यांच्या कामाचा ठसा उमटविला आहे.
२८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हापासून २८ फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.
२३ फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशातील ऐतिहासिक मांडू नगरीत बालहक्क चळवळकर्ते व २०१४ मधील नोबेल शांतता पारितोषिक विजेते कैलास सत्यार्थी यांच्या हस्ते ३२व्या अखिल भारतीय प्राणीशास्त्रज्ञ काँग्रेस व पृथ्वीवरील सजीवांची शाश्वती या विषयाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन झाले. या परिषदेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्राणीशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष तथा चोपडा येथील महाविद्यालयातील प्रा.डॉ.प्रकाश लोहार यांची देश-विदेशातील संशोधकांच्या कार्याचे सादरीकरणासाठी तयार झालेल्या समितीचे अध्यक्षस्थान त्यांना मिळाले. परिषदेत त्यांनी जनुकीय विश्लेषण व त्याचे प्राण्यांच्या वर्गीकरणातील महत्व या संशोधन कार्याची ओळख करून दिली.
त्यांनी लिहिलेली १५ पुस्तके भारताच्या ५६ विद्यापीठात संदर्भग्रंथ म्हणून समाविष्ट आहेत. १५ युरोपीय व ५ आशिया खंडाच्या शैक्षणिक संस्थांना त्यांनी भेटी दिल्या आहेते.
अशा उल्लेखनीय व सात्यतपूर्ण कार्यामुळे मांडू येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जर्मनीचे डॉ.उर्लीच बर्क, झेडएसआयचे अध्यक्ष डॉ.बी.एन.पांडे, सचिव डॉ.कमल जयस्वाल व परिषदेचे आयोजक डॉ.शैलेंद्र शर्मा यांच्या हस्ते डॉ.पी.एस.लोहार यांचा अखिल भारतीय स्तरावरील प्राणीशास्त्राचा ‘रिकग्निशन अवार्ड’ सन्मानपत्र व सुवर्णपदक देवून सन्मान करण्यात आला.