पहूर येथे पंधराशे लाभार्थ्यांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:18 AM2021-09-22T04:18:28+5:302021-09-22T04:18:28+5:30
संतोष माता गणेश मित्र मंडळ व ग्रामीण रुग्णालय पहूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या लसीकरण अभियानात ३५० लाभार्थ्यांचे लसीकरण ...
संतोष माता गणेश मित्र मंडळ व ग्रामीण रुग्णालय पहूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या लसीकरण अभियानात ३५० लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आलेल्या लसीकरणात बाराशे लाभार्थ्यांना लसीकरणाचा लाभ घेतला आहे. यावेळी नायब तहसीलदार सुभाष कुंभार, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, सरपंच नीता पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा, उपसरपंच श्यामराव सावळे, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज समिती प्रमुख रामेश्वर पाटील, हरी मुंडे, चेतन रोकडे, प्रवीण कुमावत, मयूर सोनार यांच्यासह शिवराजे ग्रुप मिळ मंडळ पदाधिकारी व ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी अनमोल सहकार्य केले आहे.
ग्रामीण रुग्णालयात झालेल्या लसीकरणप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा, अधिपरिचारक ऋषिकेश भालेराव, स्वपना वंजारी, सरोज बेडसे, नीलिमा लढे, सुवर्णा चौधरी, अधिपरिचारक दीपक वाघ, बळीराम जाधव, पुरुषोत्तम पाटील, राजेश पाटील, कृष्णा पाटील, बाविस्कर, ललित केवट, प्रदीप नाईक मनीलाल जैन, देवेंद्र घोंगडे, सतीश बनसोडे, भगवान गोयर यांच्यासह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पिंळगाव येथे लसीकरण
पिंपळगाव बु. ता. जामनेर येथे २२५ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप कुमावत यांच्यासह पथकाने सेवा पुरविली. यावेळी सरपंच कल्पना विकास पाटील, उपसरपंच नुरखा ईसा तडवी, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, नाना पाटील, भारत मोहने यांच्यासह नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते.