चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबटय़ाचा पाचवा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 05:53 PM2017-11-26T17:53:48+5:302017-11-26T17:54:58+5:30

वरखेडे येथे महिलेवर हल्ला : परिसरात भीतीचा थरार कायम

Fifth victim of cannibal leopard in Chalisgaon taluka | चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबटय़ाचा पाचवा बळी

चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबटय़ाचा पाचवा बळी

Next
ठळक मुद्देमाजी आमदार राजीव देशमुख, जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगेश राजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली व भिल परिसराचे सांत्वन केले.वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी पंचनामा केला. घटनास्थळी नागरिकांनी वनविभागाच्या अधिका:यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. बिबटय़ाला दिसताक्षणी गोळा घाला, अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली.

लोकमत ऑनलाईन चाळीसगाव, जि.जळगाव, दि. 26 : नरभक्षक बिबटय़ाच्या दहशतीचे सावट कायम असून, बरोबर 12 दिवसांनंतर वरखेडे येथील दुसरा, तर एकूण पाचवा बळी बिबटय़ाने रविवारी दुपारी घेतला. यामुळे परिसरातील नरभक्षक बिबटय़ाच्या भीतीचा थरार कायम आहे. वरखेडे येथील सुसाबाई धना नाईक (भिल) या 55 वर्षीय महिलेवर बिबटय़ाने हल्ला करीत ठार केले. रविवारी दुपारी ही घटना पळसमनी शिवारात गिरणा नदीलगतच्या अमर नाईक यांच्या शेतात घडली. 10 ते 12 मजूर कापूस वेचणी करीत असताना मागाहून येत बिबटय़ाने सुसाबाईवर झडप घातली. यानंतर त्याने तिला ओढत नेले. काही अंतरावर नेऊन चेहरा व डोक्याकडील भागाचे लचके तोडले. तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाला आहे. 15 रोजी बिबटय़ाच्या हल्ल्यात वरखेडे येथीलच दीपाली नारायण जगताप या 25 वर्षीय महिलेचा बळी गेला होता. या घटनेचे दु:खद व भीतीचे व्रण ताजे असतानाच सुसाबाईचा बळी बिबटय़ाने टिपला आहे. गेल्या चार महिन्यात परिसरात बिबटय़ाने उच्छांद मांडला असून, तीन महिला व दोन किशोरवयीन मुलांना बिबटय़ाने ठार केले आहे. दीपाली जगताप यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसने मृतदेह पोलिस ठाण्यात आणून आंदोलन केले होते. प्रशसानाला धारेवर धरले होते. यानंतर वनविभागाने वनगस्त वाढवली असली तरी हुलकावणी देत बिबटय़ा मानवी व जनावरांचे बळी टीपण्यात यशस्वी ठरत आहे. तिरपोळे येथे बिबटय़ाला पकडण्याचा प्रय} वनविभागाकडून झाला. मात्र नागरिकांचा गोंगाट आणि गोंधळामुळे बिबटय़ा निसटून जाण्यात यशस्वी ठरला. दरम्यान वरखेडे येथील महिला बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झाल्याने परिसरातील ‘बिबटय़ा आला रे..’चा भयावह थरार कायम आहे.

Web Title: Fifth victim of cannibal leopard in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.