शिरसोली येथे ५० पन्नास जणांनी करून घेतली कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:15 AM2021-04-24T04:15:31+5:302021-04-24T04:15:31+5:30
कोरोना झाला म्हणजे आता आपले सर्वकाही संपले. तसेच घरात कुणाला कोरोना संसर्गजन्य आजार झाला म्हणजे बाधित व्यक्तींसह घरातील प्रत्येकाला ...
कोरोना झाला म्हणजे आता आपले सर्वकाही संपले. तसेच घरात कुणाला कोरोना संसर्गजन्य आजार झाला म्हणजे बाधित व्यक्तींसह घरातील प्रत्येकाला रुग्णालयात घेऊन उपचार केले जात होते. आपल्यालाही कोरोना झाला म्हणून लोक वाळीत टाकतील या भीतीपोटी अनेकांनी आपला आजार लपविला. यामुळे अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले. परंतु आता या आजाराविषयी बऱ्यापैकी जणजागृती व्होऊन हा आजार औषधोपचार केला की बरा होऊ शकतो. तसेच रुग्णांना होमक्वॉरंटाइन करून घरच्या घरी लवकर बरे होऊ शकतात. या सर्व भीती दूर होत असल्याने जनता आता कोरोना आजार टाळण्यासाठी स्वतः होऊन आपली कोरोनाची चाचणी करून घेऊ लागले आहेत.
-------------
कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करताना नायब तहसीलदार दिलीप बारी, मंडळ अधिकारी कमलाकर गुरव, पोलीसपाटील शरद पाटील व आरोग्य विभाग व ग्रामपंचायतचे कर्मचारी.