कालिंका माता मंदिर परिसरात हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:54 PM2020-05-11T12:54:50+5:302020-05-11T12:55:03+5:30
जळगाव : कालिका माता मंदिर परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता घडली. हाणामारीत ...
जळगाव : कालिका माता मंदिर परिसरात पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना रविवारी सकाळी ८ वाजता घडली. हाणामारीत दोन्ही गटांकडून दगड, विटा, कोयता, तसेच चाकूचा वापर झाल्याने हाणामारीत विशाल सैंदाणे, मंगेश सोनवणे आणि हितेश शिंदे हे तीन जखमी झाले आहेत. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ककरण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कालिका माता मंदिराजवळ गोलू (पूर्ण नाव माहित नाही) हा शनिवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास थांबलेला असताना विशाल नितीन सैंदाणे (रा. कांचननगर) हा तेथे आला व गोलूला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यामुळे गोलूने त्याचा मित्र मंगेश उर्फ पवन ईश्वर सोनवणे (२०), हितेश संतोष शिंदे (२०) दोन्ही रा. कांचननगर यांना बोलावून घेतले. हे पाहून विशाल सैंदाणे याने रागात दोघांना शिवीगाळ करत पवनच्या डोक्याला लाकडी दांडका टाकला. हितेशने भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला व रात्री काहीसा वाद मिटविला होता.
रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पुन्हा विशाल नितीन सैंदाणे व त्याचा मामा राजू जगन मोरे हे दोघे मंगेशच्या घरी गेले व मंगेशसह त्याच्या वडीलांना शिवीगाळ करू लागले. विशालने मंगेशच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करून जखमी केले. दोन्ही गटातून झालेल्या वादाचे हाणामारीत रूपांतर झाल्याने दगड, विटा, कोयता व चाकूचा वापर करण्यात आला. यात विशाल सैंदाणे, मंगेश सोनवणे आणि हितेश शिंदे तीन जण जखमी झाले आहेत.
जखमींना शासकीय रूग्णालयात रवाना करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
-पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुंबळ हाणामारी.
-दोन गटातील हाणामारील जखमी तिघांवर शासकीय रुग्णालयात उपचार.
-शिवीगाळ करायला केली सुरुवात.
-मित्रांना घेतले बोलावून; पुन्हा शिवीगाळ सुरु केल्याने मारहाण.
-लाकडी दांडक्यासह, लोखंडी हत्यार तसेच चाकूने केले वार.