कासव्यात किरकोळ कारणावरून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:13 AM2021-05-28T04:13:57+5:302021-05-28T04:13:57+5:30
फैजपूर : कासवा, ता. यावल येथे बुधवारी रात्री किरकोळ कारणावरून लाठ्याकाठ्यांनी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेप्रकरणी ...
फैजपूर : कासवा, ता. यावल येथे बुधवारी रात्री किरकोळ कारणावरून लाठ्याकाठ्यांनी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेप्रकरणी ११ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाणामारीत चार जण जखमी झाले आहेत.
बुधवारी रात्री कासवा गावात किरकोळ भांडणाच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. यात फिर्यादी पवन पंढरी कोळी, पंढरी बारकू कोळी, बापू शांताराम सपकाळे, मनकरीनाकाबाई रमेश तायडे हे चार जण जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी पवन कोळी यांनी फिर्याद दिली. त्यावरून विनोद सपकाळे, सोपान सपकाळे, जगदीश सपकाळे, विकास सपकाळे, जितू सापकाळे, ललित सपकाळे, संजय सपकाळे, कमलाकर सपकाळे, लहू सपकाळे, सुकदेव सपकाळे व भूषण सपकाळे (सर्व रा. कासवा) यांच्याविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सपोनि प्रकाश वानखडे व सहकारी करीत आहेत.