नशिराबादला हाणामारी, विळा,काठीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:17 AM2021-03-17T04:17:39+5:302021-03-17T04:17:39+5:30

नशिराबाद : दोन गटात विळा व काठीचा वापर करीत हाणामारी झाली. त्यात तीन जण जखमी झाले आहे. ही घटना ...

Fighting in Nasirabad, use of sickle, stick | नशिराबादला हाणामारी, विळा,काठीचा वापर

नशिराबादला हाणामारी, विळा,काठीचा वापर

Next

नशिराबाद : दोन गटात विळा व काठीचा वापर करीत हाणामारी झाली. त्यात तीन जण जखमी झाले आहे. ही घटना नशिराबाद पेठ भागात सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदन एकनाथ धनगर (३०)यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मागील भांडणाच्या कारणावरून गोपाळ गोविंदा धनगर याने शिवीगाळ करून विळ्याने चंदन धनगर याच्या डोक्यात गंभीर दुखापत करीत जमिनीवर फेकले. त्यासोबत खुशाल गोविंदा धनगर, भगवान गोविंदा धनगर, गोविंदा भोजू धनगर, (सर्व रा. पेठभाग, नशिराबाद ) या सर्वांनी चंदन धनगर यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली व ठार मारण्याची धमकी दिली. या वरून या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या फिर्यादीत सुनिता भगवान धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की , १४ मार्च रोजी कमलेश विष्णू धनगर याच्या हळदी च्या कार्यक्रमात नाचण्यावरून दीर गोपाळ व लोकेश प्रल्हाद धनगर यांच्यात वाद झाले होते. १५ मार्च रोजी लोकेश प्रल्‍हाद धनगर, चेतन संतोष धनगर, कुंदन एकनाथ धनगर (सर्व रा.पेठ, नशिराबाद) भूषण ज्ञानेश्वर बाविस्कर (रा. डोंगर कठोरा, यावल) हळदीच्या दिवशी झालेल्या वादावरुन गोपाळ धनगर यास लाकडी काठीने मारहाण केली. भांडण सोडवण्याकरिता गेले असता आम्हालादेखील मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सुनिता धनगर यांच्या पायाला दुखापत केली असल्याचे ही फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण ढाके तपास करीत आहे.

Web Title: Fighting in Nasirabad, use of sickle, stick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.