बुलडाणा येथील आमदारांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:12 AM2021-07-10T04:12:27+5:302021-07-10T04:12:27+5:30

पहूर ता. जामनेर : बुलडाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी अनुसूचित जाती जमाती विरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केले. त्यांच्याविरुद्ध ...

File an atrocity case against the MLAs in Buldana | बुलडाणा येथील आमदारांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा

बुलडाणा येथील आमदारांच्या विरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा

Next

पहूर ता. जामनेर : बुलडाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी अनुसूचित जाती जमाती विरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केले. त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पहूर येथे झालेल्या लहुजी संघर्ष सेनेच्या आंदोलनादरम्यान निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी मागासवर्गीयांच्या विरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी लहुजी संघर्ष सेनेने पहूर येथे ठिय्या आंदोलनादरम्यान केली असून, तशा आशयाचे निवेदन साहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना दिले आहे. या वेळी राज्य युवा अध्यक्ष स्वप्निल सपकाळे, राज्य संघटक रामा मगरे, जिल्हाध्यक्ष नाना पवार, उपजिल्हाध्यक्ष रवींद्र पवार, तालुका अध्यक्ष महेंद्र बिऱ्हाडे, दीपक गायकवाड, विजय बाविस्कर, गुलाब बाविस्कर, सुखदेव आव्हाड यांच्यासह पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

Web Title: File an atrocity case against the MLAs in Buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.