बेताल वक्तव्य करणाऱ्या पुण्याच्या प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2019 07:44 PM2019-03-05T19:44:38+5:302019-03-05T19:46:06+5:30
शिक्षकांविषयी बेताल वक्तव्य करून शिक्षकी पेशाला काळिमा असलेल्या पुणे येथील प्रा.नामदेवराव जाधव यांच्यावर गुन्हा नोंदवावा, असे निवेदन पाचोरा येथील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने प्रांताधिकारी आणि पोलिसांना देण्यात आले.
पाचोरा, जि.जळगाव : शिक्षकांविषयी बेताल वक्तव्य करून शिक्षकी पेशाला काळिमा असलेल्या पुणे येथील प्रा.नामदेवराव जाधव यांच्यावर गुन्हा नोंदवावा, असे निवेदन पाचोरा येथील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांच्या वतीने प्रांताधिकारी आणि पोलिसांना देण्यात आले.
पुणे येथील प्रा.जाधव यांनी पुणे येथे एका जाहीर कार्यक्रमात शिक्षकांच्या पवित्र कार्याबद्दल शिक्षकांची मानहानी होऊन शिक्षकी पेशाला कलंक लागेल व समाजाचा शिक्षकांकडे पाहण्याचा दर्जा दृष्टिहीन होईल असे बेताल वक्तव्य केले आहे. याबाबतची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली आहे. त्यामुळे शिक्षक समुदायाची मानहानी झालेली आहे. याचा सारासार विचार करून अशा बेताल व्यक्तव्य करणाºयावर गुन्हा दाखल करावा या आशयाचे निवेदन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे तसेच पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांना देण्यात आले.
या निवेदनावर राकेश गोकुळ पाटील, प्रवीण पाटील, अरुणा उदवंत, राजेंद्र पाटील, संदीप पवार, विजय ठाकूर, महेंद्र सोनवणे, राजेंद्र कोळी, प्रदीप जाधव, प्रवीण पाटील, सतीश सोनवणे, नवल पाटील, भावेश अहिरराव, नितीन साळुंखे याशिवाय अनेक शिक्षकांच्या स्वाक्षºया आहेत. खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ, शिक्षक सेना,अखिल पाचोरा तालुका प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद अशा विविध शिक्षक संघटनांच्या पदाधिकाºयांसह सदस्यांच्या सह्या आहेत.