डीजे लावणाºयांवर गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 12:37 AM2017-08-25T00:37:46+5:302017-08-25T00:38:09+5:30
अमळनेर : पर्यावरण कायद्यानुसार कारवाईची विशेष पोलीस महानिरीक्षकांची सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावणाºयांवर पर्यावरण संरक्षक कायदा १९८६ प्रमाणे गुन्हे दाखल करा, कायदा व सुव्यवस्थेसाठी समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा, अशा सूचना नाशिक विभागाचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.सुरेश मेकला यांनी दिले.
अमळनेर पोलीस स्टेशनला २४ रोजी दुपारी १२ वाजता झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत पोलीस अधिकाºयांच्या बैठकीत ही सूचना त्यांनी दिली.
विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.सुरेश मेकला धुळे येथे गणेशोत्सव व ईद या सणांचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यांनी जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक अमळनेर येथे घेत सूचना दिल्या.
बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी रफीक शेख, चोपड्याचे डीवायएसपी सदाशीव वाघमारे, पोलीस निरीक्षक विकास वाघ, चोपड्याचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील उपस्थित होते.
डॉ.मेकला यांनी जिल्ह्याच्या नकाशांची पाहणी करून चेकनाक्यांची माहिती घेतली. मिरवणूक व गणेश मंडळाजवळ सर्वत्र पथदिवे लावून सीसीटीव्हींची नजर ठेवा, गर्दीच्या ठिकाणी बॅरिकेड्स लावा, साध्या वेशातील पोलिसांचा बंदोबस्त चोख ठेवा, सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा, अशा सूचनाही दिल्या. एक तास बैठक सुरू होती.
जळगाव जिल्ह्यात २५०० गणेश मंडळे असून प्रत्येक गणेश मंडळाला नियमावलीची सीडी पुरविण्यात आली आहे. यावर्षी प्रत्येक तालुक्यात उत्कृष्ट, शिस्तबद्ध, पर्यावरणपूरक देखावे करणाºया गणेश मंडळांना बक्षिसे देण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीवर व विसर्जनाच्या ठिकाणी ड्रोन कॅमेºयाने नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच सर्वत्र सीसीटीव्ही असून महिलांचे विशेष पथक टारगटांवर कारवाई करणार आहे. जिल्ह्यात १५०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव पाठविल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली.