हवामान खात्यावर गुन्हा दाखल करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:13 AM2021-07-17T04:13:44+5:302021-07-17T04:13:44+5:30
दिवसागणिक वाढणारी महागाई आणि त्यातच प्रत्येक पिकावर किडीचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे पिकांचे उत्पादन घेताना शेतकरी मेटाकुटीला ...
दिवसागणिक वाढणारी महागाई आणि त्यातच प्रत्येक पिकावर किडीचा वाढता प्रादुर्भाव त्यामुळे पिकांचे उत्पादन घेताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तसेच शासनाने कीटकनाशक कंपन्यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवावे, अवास्तव किंमत आज कंपन्या आकारताना दिसत आहेत. त्या अनुषंगाने शेतकरी सध्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत आहेत.
शासनाने लवकरात लवकर चोपडा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा व शेतकऱ्यांना पेरणीसाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशा मागणीचे निवेदन प्रांत अधिकारी सुमित शिंदे यांच्याकडे देण्यात आले. अन्यथा शेतकरी संघटना आंदोलन करेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनावर संदीप पाटील माजी जिल्हाध्यक्ष, किरण गुर्जर उपजिल्हाध्यक्ष, संजय महाजन जिल्हाध्यक्ष, सचिन शिंपी चोपडा तालुका अध्यक्ष, देवेंद्र पाटील, संजय पाटील, विनोद पाटील, नामदेव महाजन, अजित पाटील, विनोद धनगर, ॲड. अंबादास पाटील, प्रदीप पाटील, राहुल पाटील, वसंत पाटील, वैभव पाटील, प्रवीण नेवे, विलास माळी, नरेंद्र पाटील, ॲड. राहुल पाटील, प्रेमचंद धनगर, अखिलेश पाटील, खुशाल सोनवणे, मंगेश राजपूत, नंदलाल पाटील, धानवड जीवन चौधरी, सय्यद देशमुख, सुनील पाटील, संजय पाटील, विजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो १७सीडजे ४