पीक विमा नाकारणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2018 01:40 AM2018-07-03T01:40:15+5:302018-07-03T01:41:19+5:30

जळगाव जिल्हाधिकाºयांचे आदेश : १८ गावातील शेतकºयांच्या पीक विम्याच्या भरपाईचा प्रश्न

File an FIR against a company refusing to pay a crop insurance | पीक विमा नाकारणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करा

पीक विमा नाकारणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करा

Next




कळमसरे, ता. अमळनेर, जि.जळगाव : सन २०१७-१८ खरीप हंगामात पीक विमा भरपाई नाकारणाºया ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीवर तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यांनी जिल्हा बॅकेला दिले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कळमसरे गावातील ३११ शेतकºयांसह अमळनेर तालुक्यातील १८ गावांची नावे विमा भरपाई यादीतून वगळल्याने संतप्त शेतकºयांचे शिष्टमंडळ प्रथम जिल्हा बँॅकेच्या अधिकाºयांना भेटले. त्यानंतर जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना निवेदन देऊन आपली व्यथा माडली. जिल्हाधिकाºयांनी शेतकरी, विमा प्रतिनिधी व जिल्हा बॅकेचे कार्यकारी संचालक यांना बोलावून सविस्तर चर्चा केली असता.
अमळनेर तालुक्यातील १८ गावांचा विमा योजनेत समावेश नव्हता. त्यांच्याकडून कंपनीला लाभार्थी शेतकºयांच्या नावांची यादीच प्राप्त नसल्याने, विमा भरपाई देत येत नसल्याचे सांगून विमा प्रतिनिधीने हात वर केले.
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती बँकेने या १८ गावांच्या शेतकºयांची कापूस विमा हप्ता रक्कम मुदतीत विमा कंपनीला पाठविल्याचे कागद पत्रांवरून सिद्ध झाले. १८ गावांच्या शेतकºयांची नावे मिळाली नाहीत, तर त्यांच्याकडून स्वीकारलेली विमा हप्ता रक्कम शेतकºयांना परत का केली नाही? या प्रश्नावर कंपनी व जिल्हा बँक निरूत्तर होऊन एकमेकांकडे अंगुली निर्देश करू लागले.
शेतकºयांची बाजू पाहता या प्रकरणी विमा कंपनीस दोषी धरून जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकांना विमा कंपनीवर तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश जागीच दिले.
याप्रकरणी शेतकºयांनी प्रति हेक्टर एक हजारप्रमाणे विमा हप्ता रक्कम कर्जाऊ स्वरूपात जिल्हा बँकेकडे भरलेली आहे. एकट्या कळमसरे गावातील ३११ शेतकºयांनी सुमारे सहा लाखांवर सव्याज आकारणी होणार असल्याने शेतकºयांवर भुर्दंड आहे.
शेतकºयांच्या याद्या आमच्याकडे आलेल्या नाहीत, त्यामुळे पीक विमा दावा देऊ शकत नाही, असे विमा कंपनीचे कृषी अधिकारी वारे यांनी सांगितले.

Web Title: File an FIR against a company refusing to pay a crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.