वॉटरग्रेस कंपनीने दिलेल्या उपठेक्याबाबत गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:42 AM2020-12-17T04:42:04+5:302020-12-17T04:42:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता घेतलेल्या वॉटरग्रेस कंपनीने आपला उपठेका साई मार्केटींगला दिला आहे. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता घेतलेल्या वॉटरग्रेस कंपनीने आपला उपठेका साई मार्केटींगला दिला आहे. त्यामुळे वॉटरग्रेस कंपनीने मनपाच्या
करारनाम्याचा भंग केला असून, मनपाची फसवणूक केली आहे. मनपाच्या अटी-शर्थींचा भंग केल्याप्रकरणी मनपाने संबधितांविरुध्द फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी ॲड.विजय भास्कर पाटील यांनी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.
बुधवारी ॲड.विजय पाटील यांनी मनपा आयुक्तांना निवेदन सादर केले. यावेळी माजी नगरसेवक सुनील माळी, रवींद्र शिंदे आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले होते की,
वॉटरग्रेस कंपनीने शहरातील व्यवसायीक सुनील झंवर यांच्या साई मार्केटींग या कंपनीला काम सोपविल्याचे स्पष्ट झाले आहे. साई मार्केटींगचे मालक झंवर यांच्या विरोधात पुणे गुन्हे शाखेने तपासणीसत्र सुरु केले आहे. या तपासणीत झंवर यांच्या कार्यालयात वॉटरग्रेस संबंधी कागदपत्रे आढळून आले आहेत. यासह या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे एटीएम देखील सापडले होते. तसेच साई मार्केटींग व वॉटरग्रेसमध्ये करार देखील झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच अनेक नगरसेवक वॉटरग्रेसकडून हप्ते देखील घेत असून, कंपनीसह त्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी या निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.