सरपंचपदाच्या उमेदवाराचे अपहरण करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:15 AM2021-02-14T04:15:59+5:302021-02-14T04:15:59+5:30
जळगाव : बांभोरी, ता.धरणगाव येथे सरपंचपदाच्या उमेदवाराला मारहाण करून त्याचे अपहरण करण्यात आले. अपहरण करणारे भिकन नन्नवरे व त्यांच्या ...
जळगाव : बांभोरी, ता.धरणगाव येथे सरपंचपदाच्या उमेदवाराला मारहाण करून त्याचे अपहरण करण्यात आले. अपहरण करणारे भिकन नन्नवरे व त्यांच्या सहकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे.बांभोरी येथील सरपंचपद अनुसूचित जातीसाठी राखीव निघाले असून त्या जागेवर सचिन यशवंत बिऱ्हाडे हे एकमेव उमेदवार विजयी झालेले आहेत. ते सरपंच निश्चित असल्याने त्यांनी या पदासाठी अर्ज दाखल करू नये यासाठी धमकावण्यात आले. पोलिसांनाही त्याची कल्पना देण्यात आली तरी देखील पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप सपकाळे यांनी केला आहे.
हर्षवर्धन कॉलनीतून दुचाकी लांबविली
जळगाव : निमखेडी रस्त्यावरील हर्षवर्धन कॉलनीत वास्तव्याला असलेले अरविंद बाबुराव बागुल (६८) यांची दुचाकी (क्र.एमएच १९- एक्यू २७१७) चोरट्यांनी घरासमोरुन लांबविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार संजय भालेराव तपास करीत आहे.
सट्टा खेळणाऱ्याला पकडले
जळगाव : चौबे शाळेजवळ भिलपुरा परिसरात सट्टा खेळणाऱ्या नाजीम शेख नूरमोहम्मद (४०,रा.भिलपुरा) याला पोलिसांनी शनिवारी दुपारी अडीच वाजता पकडले. त्याच्याकडून सातशे रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.