जळगाव कृउबा सभापतींविरोधात संचालकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल- मनमानी कारभाराचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:44 PM2017-10-23T15:44:55+5:302017-10-23T15:51:54+5:30
सुरेशदादा राजकारणात सक्रीय: १३ संचालकांनी घेतली जिल्हाधिकाºयांची भेट
आॅनलाईन लोकमत,
जळगाव, दि.२३- कृउबा समिती सभापती प्रकाश आनंदा नारखेडे यांच्याविरोधात कृउबाच्या १७ पैकी १३ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.आमदार सुरेशदादा जैन यांच्या बंगल्यावर गेल्या दोन दिवसांपासून बैठकांचे सत्र झाल्यानंतर सोमवारी सकाळी हे १३ संचालक सुरेशदादांच्या बंगल्यावर जमले. तेथून महापौर ललित कोल्हे व माजी उपमहापौर सुनील महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. जिल्हाधिकाºयांना याबाबत निवेदन देऊन अविश्वास ठराव पारित करण्यासाठी विश्ोष सभा बोलविण्याची मागणी केली. त्यानुसार विशेष सभा बोलविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपाचे ७ सदस्य तर शिवसेनेचे ६ व लक्ष्मण गंगाराम पाटील (लकी टेलर) यांच्या गटाचे ५ सदस्य निवडून आले होते. त्यावेळी भाजपाचे प्रकाश नारखेडे हे सभापती तर शिवसेनेचे कैलास छगन चौधरी हे उपसभापती झाले होते. तर १८ पैकी एक संचालक भरत धनाजी पाटील यांचे नुकतेच निधन झाले आहे.
सभापतींबाबत नाराजी
सभापती नारखेडे हे मनमानीपणे कारभार करतात. संचालकांना विश्वासात घेत नाहीत. एकतर्फी कामकाज करतात. बाजार समितीच्या सभांमध्ये बोलू देत नाहीत. तसेच मासिक सभा देखील नियमित घेत नाही. दोन-दोन महिने मासिक सभा घेत नाहीत, अशी संचालकांची तक्रार आहे. या मनमानीपणामुळे संचालकांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यानंतर अनेक घडामोडी होऊन लकी टेलर यांचा गट सेनेकडे आला. आठ दिवसांपासून सभापतींवर अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र त्यास दिशा मिळत नव्हती. दोन दिवसांपूर्वी हे सर्व संचालक माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याकडे गेले. तेथे दोन दिवस संचालकांच्या बैठका झाल्या. सुरेशदादांनी सक्रिय सहभाग घेत प्रत्येक संचालकांचे मत जाणून घेतले. सभापती बदल करण्याचीच प्रत्येकाची मागणी असल्याने अविश्वास प्रस्ताव आणण्याचे निश्चित झाले.
भाजपाचे तीन सदस्य फुटले
भाजपाचे मनोहर भास्कर पाटील, नितीन बाळकृष्ण बेहेडे यांच्यासह अन्य एक असे तीन संचालक रात्रीतून सेनेच्या गोटात दाखल झाले. लकी टेलर हे नूतन सभापती होणार असल्याचेही निश्चित करण्यात आले आहे. तीन वर्ष तेच या पदावर कायम राहतील. तर उपसभापती मात्र दरवर्षी बदलण्यात येतील, असे निश्चीत करण्यात आले असल्याची माहिती उपसभापती कैलास चौधरी यांनी दिली,
महापौरांसह संचालक जिल्हाधिकाºयांकडे
सोमवारी सकाळी १० वाजता सर्व संचालक सुरेशदादांच्या ७ शिवाजीनगर येथील निवासस्थानी जमले. तेथून महापौर ललित कोल्हे व माजी उपमहापौर सुनील महाजन यांच्यासह दोन वाहनांमधून हे संचालक जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यासाठी विश्ोष सभा बोलविण्याची मागणी केली. त्यानुसार ३० आॅक्टोबर अथवा १ नोव्हेंबर रोजी कृउबाची विश्ोष सभा होणार आहे.