दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

By Admin | Published: May 29, 2017 01:02 PM2017-05-29T13:02:31+5:302017-05-29T13:02:31+5:30

भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात वरणगाव येथील एकाचा मृत्यू झाला होता़ या प्रकरणी बामणोद येथील दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़

Filed under the death of two-wheeler | दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल

googlenewsNext

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.29- भरधाव दुचाकी एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात वरणगाव येथील एकाचा मृत्यू झाला होता़ या प्रकरणी बामणोद येथील दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़
वरणगाव येथील अक्सा नगर भागातील सैय्यद अहमद अली मन्वरअली हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून जात असताना, ओव्हरटेकच्या नादात संशयीत आरोपी जितेंद्र देविदास डोळसे (बामणोद,ता़यावल) याने सैय्यद यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने सै़अहमद यांचा जागीच मृत्यू झाला होता़ रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास महामार्गावरील जेके इस्टेटसमोर घडला होता़ या प्रकरणी जितेंद्र डोळसे याच्याविरुद्ध भगवान लक्ष्मण भिवराये (साने गुरूजी नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला़ 

Web Title: Filed under the death of two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.