मालकांसह सात गणेश मंडळांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 09:36 PM2017-09-26T21:36:19+5:302017-09-26T21:37:37+5:30
धार्मिक सण, उत्सवात वाद्यांच्या ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देऊनही त्याचे पालन न करता मर्यादेपेक्षा जास्त आवाजात वाद्य वाजविणाºया जिल्ह्यातील सात मंडळाचे पदाधिकारी, आयोजक तसेच वाद्य मालक यांच्याविरुध्द वरणगाव, भडगाव, भुसावळ व जळगाव रामानंद नगर आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२६ :
जळगाव : धार्मिक सण, उत्सवात वाद्यांच्या ध्वनी प्रदुषणावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देऊनही त्याचे पालन न करता मर्यादेपेक्षा जास्त आवाजात वाद्य वाजविणाºया जिल्ह्यातील सात मंडळाचे पदाधिकारी, आयोजक तसेच वाद्य मालक यांच्याविरुध्द वरणगाव, भडगाव, भुसावळ व जळगाव रामानंद नगर आदी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यांच्यावर दाखल झाले गुन्हे
भुसावळ शहरातील लोकमान्य मंडळातील मोर्या डी.जे.चे मालक, भडगाव येथील प्रभात गणेश मंडळाचे पदाधिकारी व डी.के.डी.जे.चे प्रो.आॅडीओ धुळेचे मालक, भडगाव येथील अंकुश गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि पारोळा येथील सवर डी.जे.चे मालक, भडगाव येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळाचे पदाधिकारी आणि डी.जे ७ धुळे येथीलमालक, आझाद मित्र मंडळ भडगावचे अध्यक्ष आणि धुळे येथील गणराया डी.जे.चे मालक, वरणगाव, ता.भुसावळ येथील मजदूर गणेश मंडळ भवानी नगरचे अध्यक्ष आणि बॅँजो सिस्टीम्सचे मालक व जळगाव शहरातील एल.के.फांउडेशन आयोजित दहिहंडी उत्सव आयोजक व राऊंड सिस्टीम्स आॅपरेट यांचा समावेश आहे.
आरटीओकडून वाहनांची तपासणी
पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने कलम १८८,२८३, २९०,२९१, भादवि कलम २२ (एन), १३१, १३६,१४० महाराष्टÑ पोलीस कायदा कलम ३ (१), ४ (१), ५ (१) ध्वनी प्रदूषण नियम २००० आणि कलम १५,१९ पर्यावरण संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत. तर यात वाद्याची वाहने जप्त करुन आरटीओमार्फत त्यांची तपासणी करण्यात आली आहे. नियमबाह्य वाहनावर दंड आकारण्यासह ६० दिवसासाठी वाहनाचा परवाना निलंबित करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी दिली.
नवरात्रीत आवाजाची मर्यादा मोजणार
गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्र, मिरवणूक तसेच मोहरममध्ये वाजविण्यात येणाºया वाद्यांच्या आवाजाचे नमुने घेण्यात येणार आहेत. त्याबाबत जिल्ह्यातील सर्व उपअधीक्षक व प्रभारी अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत.त्यामुळे मंडळांनी पर्यावरण संरक्षणासाठी मदत करावी असे आवाहन पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी केले आहे.