भुसावळ परीसरात 80 टक्के पेरणी पूर्ण

By admin | Published: July 16, 2017 05:45 PM2017-07-16T17:45:44+5:302017-07-16T17:45:44+5:30

भुसावळ परिसरात मुसळधार पावसाने पिके तरारली

Fill 80 percent of sowing in Bhusaval | भुसावळ परीसरात 80 टक्के पेरणी पूर्ण

भुसावळ परीसरात 80 टक्के पेरणी पूर्ण

Next

ऑनलाईन लोकमत 

भुसावळ,दि. : भुसावळसह परीसरात आता र्पयत 80 टक्के पेरणीची कामे आटोपली असली तरी अद्यापही अध्र्या  तालुक्यात चांगला पाऊस झाला नसल्याची माहिती येथील कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, रविवारी शहरासह परिसरात सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाला. शहरातील सखल भागात पाणी साचले.
3.4 मी.मी.पाऊस
भुसावळ शहर आणि तालुक्यात रविवारी सकाळी 8 वाजे र्पयत 3.4 मी.मी.पावसाची नोंद झाली असल्याची माहिती शहरातील तापी नदी काठावरील केंद्रीय जल आयोगाच्या सूत्रांनी दिली.
28 हजार हेक्टर क्षेत्र 
तालुक्याचे पेरणी योग्य एकूण क्षेत्र तब्बल 28 हजार इतके आहे. यात बागायती कापसाचे क्षेत्र चार हजार 600 हेक्टर आहे. या कापासाची लागवड मे मध्येच करण्यात आली. मात्र जुलै महिना अर्धा होऊनही बागायती कापसाची अपेक्षीत वाढ झाली नसल्याने उत्पन्नात घट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Fill 80 percent of sowing in Bhusaval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.