विद्यापीठ प्राधिकरणाच्या रिक्त जागा भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 09:49 PM2019-11-16T21:49:11+5:302019-11-16T21:49:34+5:30
जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या काही अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष व सदस्य पदे रिक्त झाली असून प्राधिकरणावरही ...
जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या काही अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष व सदस्य पदे रिक्त झाली असून प्राधिकरणावरही प्राध्यापक, विद्यार्थी, संस्थाचालक, प्राचार्य यांच्या जागा रिक्त आहेत़ या जागा पारदर्शकपणे भरण्यात याव्यात, यासाठी त्वरित विद्यापीठाच्या स्थायी समितीची बैठक घेण्यात यावी अशी मागणी एनुक्मटो संघटनेकडून करण्यात आली आहे़
नुकतीच एनमुक्टो संघटनेची बैठक झाली़ यामध्ये संघटनेचे अध्यक्ष प्रा़ डॉ़ संजय सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती़ बैठकीत सोनवणे यांनी विद्यापीठ प्राधिकरणाच्या रिक्त जागांबाबत उपस्थितांना माहिती दिली़ नंतर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्याच्या कार्यपध्दतीवर चर्चा करण्यात येऊन बैठकीत रोष व्यक्त करण्यात आला़ तर प्राध्यापकांना उन्नत अभिवृद्धी योजनेतर्गत बढती मिळवण्यासाठी विद्यापीठाने आयोजित केलेल्या केंद्रीय मूल्यमापन शिबिराबद्दल संघटनेतर्फे कुलगुरूंचे अभिनंदन करण्यात आले़ दरम्यान, ग्रंथपालांना भविष्यात अडचणी निर्माण होवून नये यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न केले जात असतान व्यवस्थापन परिषद सदस्याकडून हरकत नोंदविण्यात आली व विद्यापीठाची प्रतिमा डागळ्याचा प्रयत्न केला गेला म्हणून त्या सदस्यावर विद्यापीठाने कारवाई करावी, अशीही मागणी बैठकीत करण्यात आली़ बैठकीत संघटनेचे प्रा़ बी़पी़सावखेडकर, सुधीर पाटील, मनोज गायकवाड, किशोर कोल्हे, अनिल पाटील, चतुत सावंत, सचिन नांद्रे, पी़बी़बहिरराव, एस़आऱ गोसावी, संध्या सोनवणे, इ़जी़नेहते, मोहन पावरा़ गौतम कुंवर, मधुलिका सोनवणे, मनोहर पाटील, दिनेश पाटील आदींची उपस्थिती होती़