भर वस्तीत डीपीला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 01:33 AM2018-09-10T01:33:00+5:302018-09-10T01:33:21+5:30

आॅईल गळतीने आग? : अनेक ठिकाणचा वीजपुरवठा करावा लागला खंडित

Filled DPO fire | भर वस्तीत डीपीला आग

भर वस्तीत डीपीला आग

Next


भुसावळ, जि.जळगाव : येथील न्यायालयामागील विद्युत डीपीच्या खालील बॉक्स व कटआऊटला भीषण आग लागली. रविवारी सायंकाळी सव्वासात ते साडेसातच्या दरम्यान ही घटना घडली. आग इतकी भयानक होती की, या आगीत डीपीतून बॉक्समध्ये जाणाऱ्या केबलसह बॉक्स व थ्री फेस कटआऊट पूर्णपणे जळूत खाक झाले.
ऐन सणासदीचा दिवस व सायंकाळची वेळ असल्याने तेथील रस्ता नेहमी गजबजलेला असतो. आग ऐवढी भीषण होती की, तिचे गोळेचे गोळे खाली पडत होते.
डीपीतील आॅईलने आणखी जास्त आग भडकली असती व त्या डीपीपासून अगदी काहीच अंतरावर जवळच दोन नंबरचा पेट्रोलपंप होता. त्यालाही धोका होता. याशिवाय न्यायालयाच्या इमारतीलाही आग लागून महत्वाचे रेकॉर्ड जळून खाक झाले असते. समोरच दवाखानादेखील होता. या आगीमुळे शांतीनगर, सहकारनगर, भोळे कॉलनी, कोटेचा कॉलेज परिसर, कोर्ट फीडर, तहसील कार्यालय, कुळकर्णी प्लॉट, मेथाजी मळा, वसंत टॉकीज परीसर, गवळी वाडा, म्युनिसिपल पार्क या भागातील वीजपुरवठा एक ते दिड तास खंडित करण्यात आला.
सायंकाळ असल्याने अंधारामुळे वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांना त्रास झाला. बॅटरीच्या व मोबाइलच्या उजेडात कर्मचाºयांनी ११ ठिकाणचा वीजपुरवठा बंद केला. नगरपालिकेच्या अग्निशमनच्या एका बंबाद्वारे आग आटोक्यात आणली.
आग लागल्याची माहिती म्युनिसिपल पार्कमधील कैलास साळी या युवकाने कळवली. वीज वितरण कंपनीचे दिनेश फेगडे, लीलाधर कोळी, समाधान कोतवाल, प्रमोद धनके, रवींद्र सोनवणे, भूषण पाटील, विजय चौधरी यांनी धाव घेतली. आग लागल्याने ट्रान्सफॉर्मरच्या खाली असलेल्या बॉक्स व कटआऊट व केबलचे ७० ते ८० हजाराचे नुकसान झाले. या डीपीवरुन वकील गल्ली, निंभोरकर वाडासह १५० घरांचा विद्युतपुरवठा बंद झाला असून, सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरू करण्यात येईल, असे वीज वितरण कंपनीचे कर्मचारी दिनेश फेगडे यांनी सांगितले.
सणांमध्ये १५० कुटुंबांना पूर्ण रात्र अंधारात काढावी लागणार असल्याने तेथील रहिवाशी संतप्त झाले. आगीचे कारण समजू शकले नाही, पण ट्रान्सफॉर्मरमधील आॅईल लीक झाल्याने आग लागल्याची चर्चा आहे.

Web Title: Filled DPO fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.