पुलाचा भराव गेला वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 05:53 PM2020-06-18T17:53:18+5:302020-06-18T17:53:45+5:30
सातपुड्यालगतचा कुसुंबा रस्ता : पावासामुळे नाल्याला पूर
उटखेडा, ता. रावेर : सातपुडा पर्वताच्या लगत असेलल्या कुसुंबा रस्त्यवरील पुलाचा भराव नाल्याला आलेल्या पुरामुळे वाहून गेला आहे. ही घटना मंगळवारी रात्री घडली. याची दुसरुस्ती व्हावी व रस्ताही चांगला करावा, अशी मागणी या परिसरातूून होत आहे.
रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या कुसुंबा या गावापासून काही अंतरावर पर्वत रांगेत निसर्गाच्या सानिध्यात भिवानी मातेचे मंदिर असून या ठिकाणी दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. मात्र कुसुंबा ते देवीच्या मंदिरा पर्यंतच्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे . या मार्गात नाला येत असल्याने या नाल्याला पावसाळ्यात डोंगरातील पाणी मोठया प्रमाणात येत असते. भाविकांना या पाण्यातून मार्ग काढावा लागतो व प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने या नाल्यावर सहा महिन्यापूर्वी कॉक्रीटीकरण करण्यात आले होते. परंतु मंगळवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावल्याने डोंगरातीमधील पाणी या नाल्याला आल्याने या नाल्यावरील पुलाचा भराव वाहून गेला आहे. पुलाचा भराव वाहून गेला असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधीत विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असून पुलाचा भराव लवकरात लवकर टाकून मार्ग चांगला करावा, अशी मागणी होत आहे. तर हे काम असे व्हावे की, पुन्हा पूर आला तरी नुकसान होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.