पहूर पेठ ग्रामपंचायतीचे ‘माझी वसुंधरा’अंतर्गत राज्यस्तरावर अंतिम मूल्यांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:14 AM2021-05-30T04:14:03+5:302021-05-30T04:14:03+5:30
गेल्या सहा महिन्यांपासून माझी वसुंधरा अभियान पेठ ग्रुप ग्रामपंचायत राबवित आहे. याअंतर्गत केलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हा, तालुका ...
गेल्या सहा महिन्यांपासून माझी वसुंधरा अभियान पेठ ग्रुप ग्रामपंचायत राबवित आहे. याअंतर्गत केलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी जिल्हा, तालुका व उपविभागीय आयुक्तांच्या समितीने केली. यासाठी राज्यातून पात्र झालेल्या बारा ग्रामपंचायतींची निवड झाली. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील ७, तर जामनेर तालुक्यातून पहूर पेठ एकमेव ग्रामपंचायत स्पर्धेच्या अंतिम मूल्यांकनाच्या स्पर्धेसाठी पात्र ठरली. ग्रुप ग्रामपंचायत पेठचे कार्य उल्लेखनीय असल्याचे गौरव उद्गार गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी यांनी काढून सादरीकरणावर प्रशंसा केली आहे.
व्हर्च्युअल टूरद्वारे मूल्यांकन
कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या समितीला प्रत्यक्ष पाहणी करता येणार नाही. त्यामुळे शासन आदेशानुसार ‘व्हर्च्युअल टूर’द्वारे पहूर पेठ ग्रामपंचायतने राबविलेल्या अभियानाचे मूल्यांकन बारा ठिकाणी निश्चित करून सादरीकरण केले. सर्व प्रथम ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये सरपंच नीता रामेश्वर पाटील यांनी वसुंधरा अभियानाचे सादरीकरण करीत उत्कृष्ट मांडणी केली. यानंतर सेंद्रिय खतप्रकल्प, बायोगॅस, सौर ऊर्जा, रेन हार्वेस्टिंग, वृक्षलागवड, परस बाग, जीवनामृत,जलसंवर्धन, दुचाकी चार्जिंग पॉईंट याठिकाणी ऑनलाइन पद्धतीने सादरीकरण केले. यात राजधर पांढरे, शैलेश पाटील, शरद बेलपत्रे, किरण खैरनार, भारत पाटील, मनोज जोशी, शंकर भामेरे, संदीप बेढे, सचिन पाटील, जीवन पाटील व दीपक दौंगे यांनी समितीला ऑनलाइन ‘व्हर्च्युअल टूर’द्वारे कामांची मांडणी सादर केली.
समितीकडून मूल्यांकन
राज्य शासनाच्या वतीने विभागीय उपआयुक्त अरविंद मोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एन. पाटील, ग्रामविकास यंत्रणा समिती यात ऑनलाइन सहभागी झाली, तर तालुका स्तरावरून गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी, अतिरिक्त गटविकास अधिकारी के. बी. पाटील, ग्रामविकास अधिकारी अशोक पालवे, संजय बैरागी यांनी प्रत्यक्ष नियंत्रण ठेवले. यावेळी उपसरपंच श्यामराव सावळे, सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. पी. टेमकर व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.
===Photopath===
290521\29jal_8_29052021_12.jpg
===Caption===
पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने ‘माझी वसुंधरा’ या अभियानसाठी राज्यस्तरीय सादरीकरण करताना निता पाटील, रामेश्वर पाटील, ज्योती कवडदेवी, डि. पी. टेमकर आदी.