शेती मशागत अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:12 AM2021-06-10T04:12:33+5:302021-06-10T04:12:33+5:30

भडगाव तालुक्यात होणार ३७ हजार ६९३ हेक्टर क्षेत्रावर पीक पेरण्या खरीप हंगाम पीक पेरणीसाठी सर्वसाधारण क्षेत्र एकूण ५० ...

In the final stages of cultivation | शेती मशागत अंतिम टप्प्यात

शेती मशागत अंतिम टप्प्यात

Next

भडगाव तालुक्यात होणार ३७ हजार ६९३ हेक्टर क्षेत्रावर पीक पेरण्या

खरीप हंगाम पीक पेरणीसाठी सर्वसाधारण क्षेत्र एकूण ५० हजार ९१२ इतके आहे, तर मागील वर्षी तालुक्यात या क्षेत्रापैकी एकूण ३७ हजार ६९३ हेक्टर क्षेत्रावर पीक पेरण्या झाल्या होत्या. या वर्षी तालुक्याला खरीप हंगामात पीक पेरण्यांचे उद्दिष्ट एकूण ३७ हजार ६९३ इतके आहे. मागील वर्षी भडगाव तालुक्यात कापूस लागवड एकूण ३३ हजार ६७८ पैकी २५ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली होती. आता कापूस लागवडीच्या क्षेत्रात वाढ होऊन एकूण २७ हजार हेक्टर क्षेत्रात लागवड होण्याची अपेक्षा आहे.

भडगाव येथे शासनाने भरडधान्य खरेदीची मागणी

महिनाभरापासून शासनामार्फत ज्वारी, गहू, मका आदी भरङधान्य खरेदी करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आली आहे. मात्र, पणन रब्बी हंगाम २०२०-२१ वर्षासाठीचे शासनामार्फत अद्यापही भरडधान्य खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. तरी शासनाने तत्काळ भरडधान्य खरेदी केंद्र सुरू करावे. शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी भडगाव तालुक्यातील शेतकरीवर्गातून जोर धरीत आहे. ज्वारी धान्याची एकूण १०६२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. मका धान्याची एकूण ५६० शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केलेली आहे, तर मका धान्याची एकूण १२ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.

Web Title: In the final stages of cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.