अखेर `त्या` १७१ प्रशिक्षणार्थींना आजपासून प्रशिक्षणासाठी बोलावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:28 AM2021-02-18T04:28:30+5:302021-02-18T04:28:30+5:30
`लोकमत`ला दिली. कोरोनामुळे एस. टी. महामंडळाची सेवा सहा महिने ठप्प असल्यामुळे, परिणामी महामंडळाचे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. ...
`लोकमत`ला दिली.
कोरोनामुळे एस. टी. महामंडळाची सेवा सहा महिने ठप्प असल्यामुळे, परिणामी महामंडळाचे करोडो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीही महामंडळाकडे पैसे नसल्यामुळे महामंडळाने २०१९ मध्ये विविध संवर्गातील भरती झालेल्या ३ हजार ११६ प्रशिक्षणार्थी उमेदवारांची सेवा गेल्या वर्षी जूनमध्ये तात्पुरती स्थगित केली होती. यामध्ये जळगाव विभागातील १७१ उमेदवारांचा समावेश होता. स्थगिती दिल्यामुळे हे उमेदवार घरीच थांबून होते. दरम्यान, चार महिन्यांपासून कोरोनाचे
प्रमाण कमी झाल्यामुळे या उमेदवारांनी पुन्हा प्रशिक्षण सुरू करण्याच्या मागणीसाठी विभाग नियंत्रकांची भेट घेतली होती, तसेच या उमेदवारांनी तातडीने सेवेत न घेतल्यास
उपोषण करण्याचाही निर्णय घेतला होता. या उमेदवारांनी प्रशिक्षण सुरू करण्याबाबत मोठ्या प्रमाणावर मागणी लावून धरल्याने, अखेर दोन दिवसांपूर्वी महामंडळाने स्थगिती
उठवून, या प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
इन्फो :
प्रशिक्षणार्थींना दूरध्वनी व मेलवरून संदेश
महामंडळात भरती झालेले चालक-वाहक मिळून १७१ प्रशिक्षणार्थी उमेदवार हे जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणचे रहिवासी असून, त्यांना प्रशिक्षणासाठी १८ फेब्रुवारीपासून हजर राहण्याबाबत महामंडळाच्या जळगाव विभागातर्फे दूरध्वनी व मेलवरून कळविण्यात येत आहे. तरी ज्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दूरध्वनी किंवा मेल आला नसेल, तरी त्यांनी महामंडळाच्या जळगाव विभागाशी संपर्क साधून, प्रशिक्षणाला हजर राहण्याचे आवाहनही राजेंद्र देवरे यांनी केले आहे.