चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळाला अखेर न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 07:33 PM2019-01-08T19:33:09+5:302019-01-08T19:37:01+5:30

राज्यभरातील पालिकांमध्ये गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाºयांनी सायंकाळी पालिकेच्या आवारात जल्लोष केला.

Finally, 189 payday wage workers of Chalisgaon municipality got justice | चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळाला अखेर न्याय

चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाऱ्यांना मिळाला अखेर न्याय

Next
ठळक मुद्देआता सेवेत कायम होणारमंत्रीमंडळाच्या निर्णयाने जल्लोषजल्लोषप्रसंगी अनेकांना अश्रू झाले अनावर

चाळीसगाव, जि.जळगाव : राज्यभरातील पालिकांमध्ये गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत कायम करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. चाळीसगाव पालिकेतील १८९ रोजंदारी कर्मचाºयांनी सायंकाळी पालिकेच्या आवारात जल्लोष केला.
काहींना अश्रू अनावर झाले
शासनाने ११ मार्च १९९३ ते २० मार्च २००० पर्यंत पालिकांमध्ये रोजंदारी कर्मचारी म्हणून काम करणाºया कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे राज्यभरातील १४१६ रोजंदारी कर्मचाºयांना २५ वर्षांनंंतर न्याय मिळाला आहे. चाळीसगाव पालिकेतही १९९५ पासून असे १८९ कर्मचारी कार्यरत आहेत. यातील काही सेवानिवृत्तही झाले आहेत.
दुपारी मंत्रीमंडळाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कर्मचाºयांनी पालिकेच्या आवारात एकत्र येऊन आनंद व्यक्त केला. यावेळी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, गटनेते संजय रतनसिंग पाटील, उपनगराध्यक्षा आशाबाई चव्हाण, नगरसेवक अरुण अहिरे, चंद्रकांत तायडे, मानसिंग राजपूत, विजया प्रकाश पवार, विजया भिकन पवार, चिराग शेख, माजी नगरसेवक सोमसिंग राजपूत, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी उपस्थित होते.
शासनाने रोजंदारी कर्मचाºयांना खरोखरच न्याय दिल्याची प्रतिक्रिया यावेळी संजय पाटील यांनी व्यक्त केली.

गेल्या २५ वर्षांपासूून रोजंदारीवर काम करणाºया कर्मचाºयांना शासनाच्या निर्णयामुळे सेवेत संरक्षण मिळाले आहे. त्यांच्या कुटुंंबाच्या दृष्टीने हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे.
- आशालता चव्हाण
नगराध्यक्षा, नगरपालिका, चाळीसगाव

Web Title: Finally, 189 payday wage workers of Chalisgaon municipality got justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.