अखेर तीन महिन्यांनंतर गुजरात राज्यात बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:39+5:302021-07-08T04:12:39+5:30
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर खबरदारी म्हणून गुजरात व मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात येणाऱ्या बससेवेला परवानगी नाकारली ...
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर खबरदारी म्हणून गुजरात व मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातून त्यांच्या राज्यात येणाऱ्या बससेवेला परवानगी नाकारली होती. त्यामुळे एप्रिलपासून ते ६ जुलैपर्यंत एसटी महामंडळाची परराज्यातील सेवा बंदच होती. परराज्यातील सेवा बंद असल्यामुळे, महामंडळाच्या जळगाव विभागाचे दररोज ५ ते ७ लाखांचे नुकसान होत होते. अखेर महाराष्ट्रातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर गुजरात सरकारने महाराष्ट्रातील बसेसला गुजरातमध्ये प्रवासाची परवानगी दिली आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी जळगाव आगारातून गुजरातमधील सुरत, सेल्वासा, वापी व अंकलेश्वर या ठिकाणी बसेस पाठविण्यात आल्या. जळगावहून या सेवेला प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, रात्रभर या बसेस गुजरातमध्येच मुक्कामी राहणार आहे. त्यानंतर गुरुवारी पुन्हा या मार्गावर बसेस सोडण्यात येणार असल्याचे नीलेश पाटील यांनी सांगितले.