अखेर महादेव तांड्याचे टँकर पाणी भरण्यासाठी भुसावळ येथे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 02:46 PM2019-05-18T14:46:49+5:302019-05-18T14:48:19+5:30

भुसावळ तालुक्यातील वॉटर टँकरच्या स्टिंग आॅपरेशनसंदर्भात ‘लोकमत’ने दणका देताच पंचायत समितीकडून महादेव तांडा येथे पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, तर शुक्रवारपासून पुन्हा तो टँकर भुसावळ येथे पालिकेच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी पाठवण्यात येत आहे,

Finally, Mahadev Tandan tanker would leave for Bhusawal to fill the water | अखेर महादेव तांड्याचे टँकर पाणी भरण्यासाठी भुसावळ येथे रवाना

अखेर महादेव तांड्याचे टँकर पाणी भरण्यासाठी भुसावळ येथे रवाना

Next
ठळक मुद्देपाण्याचे नमुनेही तपासणीसाठी प्रयोगशाळेतबिलांची चौकशी करणार - गटविकास अधिकारीलोकमत स्टिंग आॅपरेशनचा दणका

भुसावळ, जि.जळगाव : तालुक्यातील वॉटर टँकरच्या स्टिंग आॅपरेशनसंदर्भात ‘लोकमत’ने दणका देताच पंचायत समितीकडून महादेव तांडा येथे पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, तर शुक्रवारपासून पुन्हा तो टँकर भुसावळ येथे पालिकेच्या विहिरीवर पाणी भरण्यासाठी पाठवण्यात येत आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी विलास भटकर यांनी दिली.
बिलासंदर्भात जीपीएस रेकॉर्ड मागणार
दरम्यान, वॉटर टँकर कुठे भरण्यात आला व बिले कुठली काढण्यात आली, यासंदर्भात जी.पी.एस. मशीनचा आधार घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यासंदर्भात जीपीएस मशीनचे रेकॉर्ड मागविण्यात येईल व चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
वॉटर टँकरसंदर्भात ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन केले. यात महादेव ताडा येथे पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणारा टँकर अतिशय गळका असून, ट्रॅकर भुसावळ पालिकेच्या विहिरीवरून भरण्याचे आदेश होते. मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या छुप्या आशीर्वादाने हा टँकर कधी कुºहे (पानाचे) येथील गावातून, तर कधी धरणाच्या बॅकवॉटरजवळील एका नर्सरीमधील बोअरवेलमधून भरण्यात येत होता. यासंदर्भात ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेऊन पंचायत समितीने एका विहिरीच्या पाण्याचे नमुने घेतले व हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे, तर शुक्रवारपासून पुन्हा हे टँकर भुसावळ येथून पाणी भरण्यासाठी जात असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, या टँकरमध्ये जीपीएस मशीन बसविण्यात आली आहे. मात्र तरीही हा टँकर दिलेले ठिकाण सोडून वेगळ्याच जागेवरून पाणी भरत होता, हे स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे. संबंधित अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष का केले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कुºहे (पानाचे) येथून टँकर भरण्यात येत असला, तरी पाण्याची विहीर हस्तांतरित का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हस्तांतरण नगरपालिकेची विहीर करण्यात आली नाही. पाणी मात्र अवघ्या पाच किलोमीटरवरून भरण्यात येत असल्यामुळे या प्रकरणात गैरव्यवहार झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
विहिरीसाठी दहा लाख खर्च, तरीही करावा लागत आहे टँकरने पाणीपुरवठा
दरम्यान, महादेव तांडा येथे पाणीपुरवठा करण्यात यावा यासाठी गेल्या वर्षी जवाहर रोजगार योजनेअंतर्गत विहिरीसाठी तब्बल दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. शेतकºयांसाठी केवळ दोन लाख रुपये मिळत असताना शासनाच्या विहिरीसाठी मात्र तब्बल दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. येथे विहिरीचे खोदकाम व बांधकामही पूर्ण झाले आहे. बांधकामाचे पैसे मात्र अद्याप देण्यात आले नाही. विहीर व बांधकाम पूर्ण झाले असतानाही पाईपलाईन का करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्रशासनाची बंजारा वस्तीच्या नागरिकांना पाण्यासाठी का ठेकेदाराच्या हितासाठी धडपड?
कुºहे (पानाचे) ग्रामपंचायतीच्या तब्बल दोन विहिरी अद्यापही पडून आहे. वराडसीम रस्त्यावरील गुंडाइत पाझर तलावाजवळ ग्रामपंचायतीची एक विहीर आहे. या विहिरीवरून कुºहे (पानाचे) येथे पाणीपुरवठा योजनाही राबविण्यात आली आहे, तर सूर नदीच्या जवळ गेल्यावर्षी जवाहर योजनेंतर्गत विहीर खोदण्यात आली आहे. या दोनपैकी एका विहिरीवरून पाण्याचे टँकर भरणे सोयीचे आहे. मात्र तरीही शासनाने तब्बल १५ ते १७ किलोमीटर अंतरावरील पालिकेची विहीर का अधिग्रहित केली, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावरून प्रशासन महादेवतांडावासीयांच्या पाण्यासाठी धडपडते का, की ठेकेदाराचे हित जोपासते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Web Title: Finally, Mahadev Tandan tanker would leave for Bhusawal to fill the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.