अखेर ‘त्या’ कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 09:52 PM2019-11-26T21:52:01+5:302019-11-26T21:52:20+5:30
जळगाव : महापालिकेच्या सामान्य प्रशासनाकडून १४ लोकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्या थांबविण्यासाठी महसूल उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे ...
जळगाव : महापालिकेच्या सामान्य प्रशासनाकडून १४ लोकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्या थांबविण्यासाठी महसूल उपायुक्त डॉ. उत्कर्ष गुट्टे यांनी विरोध दर्शविला होता. परंतु आयुक्त डॉ. उदय टेकाळेंनी बदल्यांचा आदेश कायम केल्यानंतर डॉ. गुट्टे यांनी कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश सोमवारी काढले.
सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांनी मनपाच्या विविध विभागातील १४ कर्मचाºयांच्या बदल्याचे आदेश काढले होते. प्रभाग समिती कार्यालयातील काही अधिकारी कर्मचाºयांनी डॉ. गुट्टे यांची भेट घेऊन कर्मचाºयांच्या बदल्या झाल्यास मनपाच्या वसुलीवर परिणाम होईल, असे कारण पुढे केले होते. त्यामुळे उपायुक्तांनी सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाला विरोध दर्शवून बदली झालेल्या काही कर्मचाºयांना विभाग प्रमुखांनी कार्यमुक्त करु नये असे आदेश काढले होते. त्यामुळे सामान्य प्रशासन व महसूल विभागातील उपायुक्तांमध्ये शीतयुध्द सुरु झाले होते. त्यानंतर टेकाळे यांनी बदल्यांचे आदेश कायम ठेवले़ त्यामुळे उपायुक्तांनी सोमवारी पुन्हा नवीन आदेश काढून आपला आधीचा आदेश रद्द केला असून बदली झालेल्या कर्मचाºयांना कार्यमुक्त करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे सदर कर्मचाºयांना बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे.