अखेर रेल्वेस्थानकावरील पादचारी पूल प्रवाशांसाठी खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:12 AM2021-07-05T04:12:58+5:302021-07-05T04:12:58+5:30
रेल्वेस्थानकावरील दक्षिण भागापासून फलाट क्रमांक ४-६ ला जोडणारा १२९ मीटरचा नवीन पूल तयार करण्यात आला आहे. चार व सहा ...
रेल्वेस्थानकावरील दक्षिण भागापासून फलाट क्रमांक ४-६ ला जोडणारा १२९ मीटरचा नवीन पूल तयार करण्यात आला आहे. चार व सहा ते उत्तर भागापर्यंत जाणारा जुना पूल ३९ मीटर इतका आहे. नवीन पुलाची रुंदी ४.८८ मीटर इतकी आहे तर उंची जवळपास तीन मीटर इतकी आहे. अत्याधुनिक पद्धतीने या पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. पूल निर्मितीसाठी तब्बल चार ते पाच वेळा रेल्वेला ब्लॉक घ्यावा लागला होता.
प्रवाशांचा फेरा वाचणार
जुना पादचारी पूल जमीनदोस्त केल्यानंतर नवीन पादचारी पूल बनवण्यासाठी तब्बल दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला.
या दरम्यान रॅम्प पद्धतीने बनविण्यात आलेल्या पुलावरून प्रवाशांना फलाटावर जाण्यासाठी समांतर सुविधा करण्यात आलेली आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारापासून रॅम्प पुलावरून चढून उतरणे इतपत तब्बल दीडशे मीटर प्रवाशांचा फेरा वाचणार आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच नवीन पुलावरून एकाच वेळेस दोन हजार प्रवासी जाऊ शकतील, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. जुना पादचारी पूल एल टाइप होता तर नवीन पूल हा सरळ करण्यात आलेला आहे.