ऑक्सिजन टँकमधून अखेर पुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:17 AM2021-03-17T04:17:17+5:302021-03-17T04:17:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ऑक्सिजन टँक अखेर बऱ्याच कालावधीनंतर मंगळवारी कार्यान्वित झाला. मंगळवारी ...

Finally start supplying from the oxygen tank | ऑक्सिजन टँकमधून अखेर पुरवठा सुरू

ऑक्सिजन टँकमधून अखेर पुरवठा सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ऑक्सिजन टँक अखेर बऱ्याच कालावधीनंतर मंगळवारी कार्यान्वित झाला. मंगळवारी दोन वेळा टँकरद्वारे यात ४ टन लिक्विड भरण्यात आले. यातून मुख्य इमारतीत पाईपलाईनद्वारे पुरवठा केला जात आहे. यामुळे ऑक्सिजनच्या वाहनांसाठी उडणारी तारांबळ आता थांबणार आहे.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून ऑक्सिजन टँक उभा होता. मात्र, पेसोची मान्यता मिळालेली नव्हती. गेल्या आठवड्यात पेसोची मान्यता मिळाल्यानंतर अखेर मुंबई येथून देान टप्प्यात टँकरद्वारे लिक्विड आणून या टँकमध्ये मंगळवारी भरण्यात आले. दरम्यान, प्रभारी अधिष्ठाता डॉ. अरूण कासोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, ॲनेस्थेशिया विभाग प्रमुख डॉ.संदीप पटेल यांनी याबाबत आढावा घेतला.

५०० सिलिंडर रोज

जुन्या अतिदक्षता विभागात १६, आपात्कालीन अतिदक्षता विभागात १० आणि कोरानाव्यतिरिक्त ४० असे रुग्ण मुख्य इमारतीत असून त्यांना या पाईपलाईनद्वारे या टँकमधून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. कोरोना कक्षांमध्ये कुठे पाईपलाईनद्वारे तर कुठे सिलिंडरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. यात दिवसाला ५०० सिलिंडर इतकी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.

टँकची क्षमता

२० किलो लीटर - २००० ते २१००० जम्बो सिलिंडर

४ टन लिक्विड भरले : ४०० सिलिंडर ऑक्सिजन तयार होणार

अशी आहे प्रक्रिया

टँकरद्वारे मुंबई येथून लिक्विड आणून ते टँकमध्ये भरण्यात येते. टँक शेजारी असलेल्या व्हेपोरायझरने या लिक्विडचे गॅसमध्ये रूपांतर होते, या ठिकाणाहून पाईपलाईन टाकून ज्या ठिकाणाहून आधी ऑक्सिजनचा पुरवठा व्हायचा त्या ठिकाणी जोडण्यात आली आहे. त्या ठिकाणाहून कक्षांमध्ये रुग्णांच्या बेडपर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.

Web Title: Finally start supplying from the oxygen tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.