अखेर लसीची गाडी आली रात्री सव्वा नऊवाजता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:16 AM2021-04-13T04:16:08+5:302021-04-13T04:16:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून कोविशिल्ड लसीचे डोस नसल्याने ठप्प असलेले लसीकरण अखेर मंगळवारपासून सुरू होणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून कोविशिल्ड लसीचे डोस नसल्याने ठप्प असलेले लसीकरण अखेर मंगळवारपासून सुरू होणार आहे. सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास नाशिक येथून ४० हजार २०० लसीचे डोस घेऊन आरोग्य विभागाचे वाहन शासकीय रुग्णालयातील औषधशास्त्र विभागात आले. या लसींचे मंगळवारी सकाळी वाटप करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात लसीकरणाने वेग पकडला असताना लसींचा तुटवडा निर्माण झाला व त्यात अनेक केंद्रावर लसीकरण ठप्प झाले होते. शहरातील केंद्रांवर तर थेट लस नसल्याने केंद्र बंद असल्याचे बोर्ड लावण्यात आले हेाते. यामुळे ज्येष्ठांसह ४५ वर्षावरील नागरिकांची गैरसोय झाली होती. दुसरा डोस घेणाऱ्यांच्या मनातही अनेक प्रश्न यामुळे निर्माण झाले होत. मात्र, हे डोस प्राप्त झाल्यामुळे आता लसीकरणाला वेग येणार असून केंद्राच्या क्षमतेनुसार त्यांना ते वाटप करण्यात येणार आहे.
काहीच केंद्रांवर लसीकरण सोमवारी केवळ १२ ठिकाणी लसीकरण झाले. यात ११९८ लोकांनी पहिला तर केवळ २२२ लोकांनी दुसरा डोस घेतला. शहरातील चेतनदास मेहता रुग्णालयात २९९ जणांनी लस घेतली. जिल्ह्यात एकूण १७६९५२ लोकांनी पहिला तर २०४४३ लोकांनी दुसरा डोस घेतला.