फायनान्स कर्मचा:याला भर दिवसा लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:58 AM2017-10-10T11:58:27+5:302017-10-10T12:01:29+5:30
वराड-वडली रस्त्यावरील घटना
ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 10 - बळीराम पेठेतील जनलक्ष्मी फायनान्स कंपनीच्या कृषी बचत गटाचे हप्ते वसूल करुन येणा:या विजय धनराज बारी (वय 22 रा.जुना खेडी रोड, जळगाव) या कर्मचा:याला दुचाकीवरुन आलेल्या तीन जणांनी बेदम मारहाण करुन त्यांच्याजवळील 1 लाख 14 हजाराच्या रोकडसह लॅपटॉप व अन्य साहित्य असा 1 लाख 46 हजार 330 रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना सोमवारी भरदिवसा दुपारी एक वाजता तालुक्यातील वराड-वडली रस्त्यावर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विजय बारी हे कृषी बचत गटाचे हप्ते घेण्यासाठी सोमवारी वराड, सुभाषवाडी, लोणवाडी व वडली परिसरात गेलेले होते.
लोणवाडी तांडा येथून सुनिता राठोड यांच्यागटाकडून 21 हजार 300 रुपये, राखीबाई गोविंदा धाडी यांच्यागटाकडून 19 हजार 170, लालचंद चव्हाण यांच्याकडून 21 हजार 200, धारा राठोड यांच्या गटाकडून 19 हजार 80, गणेश तवर गटातील दिलीप चव्हाण यांच्याकडून 14 हजार 990 असे एकुण 95 हजार 660 रुपये घेतले. तर आधीचे 19 हजार 170 रुपये जवळ होते. ही सर्व रक्कम घेऊन लोणवाडी तांडा येथून वराडमार्गे वडली येथे जात असताना 12.45 वाजता वडली शिवारातील शेषराव रामकृष्ण पाटील यांच्या शेताजवळ मागून दुचाकीवरुन आलेली तिघांनी समोर दुचाकी आडवी लावून मारहाण करुन दीड लाखाचा ऐवज लुटून नेला.
हा प्रकार घडल्यानंतर बारी यांनी वडली येथील पोलीस पाटील दिलीप पाटील व गावक:यांना माहिती दिली. त्यांनी पोलीस निरीक्षक सुनील कुराडे व म्हसावद दूरक्षेत्राचे एन.बी.सूर्यवंशी यांना घटनेची माहिती कळवली. त्यानंतर सायंकाळी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाने चावी काढली तर दुस:याने कानात मारली
दुचाकीवरील तिघांनी बारी यांना थांबवून एकाने दुचाकीची चावी काढली तर दुस:याने कानशिलात लगावली. काही समजण्याच्या आत तिस:याने पाठीला लावलेली बॅग काढली तेथून पोबारा केला. या बॅगेत 1 लाख 14 हजार 830 रुपये रोख, 20 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप, 10 हजार रुपये किमतीचे ग्राहकांना पावती देण्याचे मशीन, दीड हजार रुपये किमतीचे डोंगल असा 1 लाख 46 हजार 330 रुपयांचा ऐवज लुटून नेला.