मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 रुग्णांना मिळाली आर्थिक मदत
By admin | Published: June 21, 2017 04:46 PM2017-06-21T16:46:05+5:302017-06-21T16:46:05+5:30
सहा लाखांच्या मदतीचे युटीआर रुग्णालयांना पाठविले
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.21 - शहरातील 5 रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळावी म्हणून आमदार सुरेश भोळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे 5 रुग्णांना सहा लाखांची मदत मिळाली आहे.
जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या विविध गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याने आमदार सुरेश दामू भोळे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळावी अशी शिफारस केली होती. त्यानुसार 5 रुग्णांना सहा लाखांची मदत देण्यात आली. त्यात मसरत परवीन खान यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 50 हजारांची, मोहन अशोक ब:हाटे यांना 1 लाखांची, कशफिया खान यांना 2 लाखांची, सुरेश राजाराम धनगर यांना 50 हजारांची तर मुकेश चौधरी यांनी 1 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. त्या आशयाचे युटीआर देखील विविध रुग्णालयांच्या नावे पाठविण्यात आले आहे. उपचारासाठी आर्थिक सहाय्यता मिळाल्याने सर्व रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आमदार भोळे यांचे आभार मानले आहेत.