कळमसरे येथे आर्थिक डिजिटल साक्षरता जनजागृती अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:12 AM2021-07-08T04:12:32+5:302021-07-08T04:12:32+5:30
श्रीराम मंदिरात आयोजिलेल्या शाखेशी सलग्न १७ गावांतील ग्राहकांच्या उपस्थितीत बँकेचे अमळनेर विभागीय अधिकारी संजय प्रल्हाद पाटील यांनी शेतकरी ग्राहकांना ...
श्रीराम मंदिरात आयोजिलेल्या शाखेशी सलग्न १७ गावांतील ग्राहकांच्या उपस्थितीत बँकेचे अमळनेर विभागीय अधिकारी संजय प्रल्हाद पाटील यांनी शेतकरी ग्राहकांना आर्थिक व्यवहाराची वेळेवर व अचूक देवाण-घेवाण, कर्ज योजना पात्रता व निकष, पाच लाखांपर्यंत विमा सरंक्षण, बँकेत न येता घरबसल्या डिजिटल सेवेचा वापर, मुदत ठेवींची ऑनलाईन सुविधा, तीन लाखांपर्यंत बिन-व्याजी पीक कर्ज, खातेदाराची वारस नोंद, आदींबाबतीत सखोल मार्गदर्शन केले. निरीक्षक डी. यू. देसले यांनी सूत्रसंचालन केले. निरीक्षक पी. डी. चौधरी यांनी आभार मानले.
यावेळी विलास सोनवणे, विकास संस्थेचे सचिव सुधाकर पाटील, योगेंद्रसिंग राजपूत, सरपंच जगदीश निकम, मुरलीधर चौधरी व शेतकरी ग्राहक उपस्थित होते.