आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2020 10:47 PM2020-10-25T22:47:12+5:302020-10-25T22:48:04+5:30
जामनेर : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांसाठी शासनाने सुरू केलेल्या उभारी योजनेस चालना मिळावी यासाठी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रसाद ...
जामनेर : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांसाठी शासनाने सुरू केलेल्या उभारी योजनेस चालना मिळावी यासाठी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. तालुक्यात अशी ५५ कुटुंब असून त्यांना शासनाच्या विविध योजनेच्या माधयमातून अर्थसहाय्य द्यावे, असे आदेश असल्याने या कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या वारसास १ लाखाची मदत दिली जाते. त्याव्यतिरिक्त कुटुंबाचे पालनपोषण चालू राहावे यासाठी त्यांना मनरेगा अंतर्गत विहीर, कृषी विभागाकडून शेळीपालन व्यवसायासाठी, फळबाग लागवडीसाठी अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
तहसीलदार अरुण शेवाळे, गतविकासाधिकारी जे.व्ही.कवडदेवी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.