नकोशीं चे पालक मिळेना

By Admin | Published: April 21, 2017 05:47 PM2017-04-21T17:47:59+5:302017-04-21T17:47:59+5:30

भुसावळात काही दिवसात अनैतिक संबंधातून जन्माला आलेले चार अर्भक सापडले.

Finding the parents of the unwholesome | नकोशीं चे पालक मिळेना

नकोशीं चे पालक मिळेना

googlenewsNext

 ऑनलाईन लोकमत विशेष /गणेश वाघ  

भुसावळ, दि.21 -अनैतिक संबंधातून जन्मलेल्या तीन नकोशींसह एका नवजात अर्भकाच्या माता-पित्यांचा शोध लावण्यात चार वर्षानंतरही पोलीस यंत्रणा अपयशी ठरली आह़े भुसावळ शहरातील विविध भागात गेल्या चार वर्षात तीन नवजात स्त्री जातीसह एक पुरूष जातीचे अर्भक उघडय़ावर सापडल्याच्या घटना आतार्पयत उघडकीस आल्या आहेत़
नवजात अर्भक निजर्न ठिकाणी टाकण्यामागे अनैतिक संबंधातून या अर्भकाचा झालेला जन्म वा माता-पित्यांना मुलगी नको असावी, असा कयास आह़े पोलीस यंत्रणा गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरुवातीचे दोन दिवस रुग्णालयांची तपासणी करते मात्र त्यातूनही काही निष्पन्न होत नाही म्हटल्यानंतर सरळ गुन्ह्याची फाईल बंदच होते त्यामुळे गुन्हा करणारे प्रेमी-युगूल, या प्रकाराला खतपाणी घालणारे अज्ञात डॉक्टर वा माता-पिता मात्र दुस:यांदा कृत्य करण्यासाठी पुन्हा मोकळे होतात, असा समाजमनाचा कयास आह़े 
जंक्शन ठरतेय पथ्थ्यावर
शहरातील बहुतांश घटनांमध्ये अर्भक सापडल्याच्या घटना रेल्वे स्थानकाजवळ घडल्या आहेत त्यामुळे अज्ञात मातांनी बालकाला जन्म दिल्यानंतर बदनामीच्या भीतीने रात्रीच्या वेळी स्थानकाजवळ नवजात बालकांना सोडले असावे, असा कयास आह़े भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाने उपाययोजना कराव्यात, असाही समाजमनाचा कल आह़े
नकोशीला आशादीपचा आधार
वंशाचा दिवा मुलगाच असावा या हट्टापायी मुली नकोशी ठरत आहेत़ त्यामुळे सुज्ञ पालकही अनेकदा मुलीच्या जन्मानंतर नाखुष असल्याचा व त्यानंतर घडलेल्या अप्रिय घटना समाजापुढे आहेत त्यामुळे ब:याचदा मुलीला जन्म दिल्यानंतरही नकोशी ला अशा पद्धत्तीने बेवारस टाकले जाते. या नवजात अर्भकांना मात्र जळगावचे आशादीप आधार ठरत आह़े मुले नसलेले दाम्पत्य मात्र या नकोशींना आपलेसे करीत आहेत़

Web Title: Finding the parents of the unwholesome

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.