पालिका अभियंत्यास सात हजार रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 09:15 PM2019-08-11T21:15:31+5:302019-08-11T21:16:04+5:30

एरंडोल : माहिती अधिकारात सुनावणी

A fine of Rs | पालिका अभियंत्यास सात हजार रुपये दंड

पालिका अभियंत्यास सात हजार रुपये दंड

Next

एरंडोल : येथील नगरपालिकेत कार्यरत तत्कालीन बांधकाम अभियंता पंकज पन्हाळे यांना माहिती अधिकारात माहिती न दिल्याने दोन प्रकरणात एकूण सात हजार रुपये दंड सुनावला आहे.
राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांच्यातर्फे ही सुनावणी करण्यात आली असून एरंडोल शहरातील दोन लोकांनी मागितलेली माहिती न दिल्याने हा दंड ठोठावण्यात आला.
याबाबत माहिती अशी की एरंडोल शहरातील रहिवाशी रविंद्र नंदलाल लढे यांनी चावडी समोरील मुतारीची ६/११/१५ रोजी माहिती अधिकारात विचारली होती व ती न दिल्याने चार हजार रुपये दंड सुनावण्यात आला.
याचबरोबर दुसऱ्या प्रकरणात शहरतीलच आबा संतोष महाजन यांनीही १४/०९/२०१६ रोजी नगर पालिका कर्मचाº्याच्या कार्यालयीन पदासंदर्भात माहिती अधिकारात माहिती विचारली असता ती न दिल्याने तीन हजार रुपये दंड तत्कालीन बांधकाम अभियंता पंकज कैलास पन्हाळे यांना राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांनी सुनवला आहे.

Web Title: A fine of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.