आव्हाणे नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरला सव्वा लाखाचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:36 PM2020-02-15T12:36:27+5:302020-02-15T12:37:43+5:30

ट्रॉली फसल्याने केवळ पुढील भाग तहसील कार्यालयात जमा

A fine of Rs | आव्हाणे नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरला सव्वा लाखाचा दंड

आव्हाणे नदीपात्रात वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरला सव्वा लाखाचा दंड

Next

जळगाव : शहरासह जिल्ह्यात वाळूचे ठेके बंद असले तरी आव्हाणे परिसरात नदीपात्रामध्ये वाळू उपसा करणारे ट्रक्टर आढळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहे. त्यास एक लाख १९ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस काढण्यात आली आहे. या वेळी सरपंचपूत्र सुनील मोरे यांनी कारवाईस विरोध केला. या वेळी वाळूमध्ये ट्रॉली फसलेली असल्याने केवळ ट्रॅक्टरचा पुढील भाग आणून तहसील कार्यालयात जमा केला.
आव्हाणे नजीक नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार वैशाली हिंगे यांना मिळाली. त्या वेळी त्यांनी पथकासह आव्हाणे येथील तापी नदीपात्र गाठले. तेथे एका ट्रॅक्टरमध्ये वाळूचा अवैधरीत्या उपसा करीत असल्याचे आढळून आले. कारवाई दरम्यान चालकाने तेथून पळ काढला. त्यानंतर ट्रॉली फसलेली असल्याने दुसºया चालकाला घेऊन ट्रॅक्टरचा पुढील तहसील कार्यालयात आणून तो जप्त केला.
कारवाईवेळी सरपंच पूत्र सुनील मोरे यांनी तहसीलदारांकडे वाळूचे ट्रॅक्टर सोडावे अशी मागणी केली. एकीकडे वाळूचा लिलाव न होऊ देण्याबाबत ग्रामपंचायतने प्रस्ताव दिला आहे व दुसरीकडे वाळू चोरी करणारे ट्रॅक्टर सोडण्याची मागणी करीत असल्याने हे योग्य नसल्याचे तहसीलदार हिंगे यांनी सांगत कारवाई केली. एकतर वाळू लिलावाबाबत प्रस्ताव द्या, अन्यथा कारवाईला विरोध करू नये, असेही त्यांना सूचविले.

आव्हाणेनजीक वाळू उपसा करणाºया एका ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. ट्रॉली फसलेली असल्याने केवळ पुढील भाग तहसील कार्यालयात जमा केला. या वेळी सरपंच असल्याचे सांगून मोरे नामक व्यक्तीने कारवाई न करण्याची मागणी केली.
- वैशाली हिंगे, तहसीलदार.


वाळू उपसा करणाºया ट्रॅक्टरवरील कारवाई वेळी आपण तेथे उपस्थित होतो. मात्र कारवाई न करण्याची मागणी आपण केली नाही.
- सुनील मोरे, सरपंच पूत्र, आव्हाणे.

Web Title: A fine of Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव