मेहरुणमधील त्या वाळूसाठ्याबाबत व्यावसायिकाला साठ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:28+5:302021-07-07T04:21:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या पंचनाम्यानुसार मेहरुण शिवारात आढळलेल्या वाळूसाठ्याबाबत जळगाव तहसीलदार नामदेव ...

A fine of Rs 60 lakh was levied on a trader for that sand in Mehrun | मेहरुणमधील त्या वाळूसाठ्याबाबत व्यावसायिकाला साठ लाखांचा दंड

मेहरुणमधील त्या वाळूसाठ्याबाबत व्यावसायिकाला साठ लाखांचा दंड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सप्टेंबर २०१८ मध्ये झालेल्या पंचनाम्यानुसार मेहरुण शिवारात आढळलेल्या वाळूसाठ्याबाबत जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांनी बाळू नामदेव चाटे या वाळू व्यावसायिकाला ६० लाख ७२ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी तक्रार केली होती.

तहसीलदारांनी बाळू चाटे यांना दिलेल्या नोटिसीत म्हटले आहे की, या आधी दंडात्मक कार्यवाहीबाबत नोटीस देण्यात आली होती. त्याचा खुलासा सादर केला होता. हा खुलासा तत्कालीन तहसीलदारांनी मान्य किंवा अमान्य केलेला नाही. त्यामुळे पंचनामा सादर केलेल्या तत्कालीन मेहरुण तलाठी यांच्याकडून याबाबत खुलासा मागवला. तलाठ्यांनी २ जुलै रोजी त्याचा खुलासा सादर केला आहे. त्यात ११ सप्टेंबर २०१८ रोजी या जागेलगत वाळूसाठे होते. तसेच त्या जागेलगतच बाळू चाटे हे व्यावसायिक राहत होते. त्यामुळे हा साठा त्यांच्या मालकीचा असू शकतो, असे स्थानिक चौकशीवरून कळले. त्यामुळे हा वाळूसाठा बाळू चाटे यांच्या मालकीचा असल्याच्या निष्कर्षापर्यंत तहसीलदार पोहोचले आहेत. त्यामुळे अनधिकृतपणे विनापरवानगी वाळूसाठा केल्याने ३०० ब्रास वाळूसाठ्याबाबत व्यावसायिकालाही अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे.

कोट - संबंधित वाळू व्यावसायिकाला याआधीदेखील नोटीस बजावण्यात आली होती. तलाठी मेहरुण यांच्याकडूनही खुलासा मागवण्यात होता. ही अंतिम नोटीस आहे. त्यानंतर त्यांना थेट दंडाची रक्कम भरण्यासंदर्भात नोटीस दिली जाऊ शकते. - नामदेव पाटील, तहसीलदार

Web Title: A fine of Rs 60 lakh was levied on a trader for that sand in Mehrun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.