निवडणुकीच्या कामकाजास टाळाटाळ करणा-या जळगावातील ६९ बीएलओंविरुध्द गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:03 PM2017-11-29T12:03:33+5:302017-11-29T12:12:39+5:30
निवडणुकीच्या कामकाजास टाळाटाळ करणा-या जळगाव तालुक्यातील ६९ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याविरुध्द मंगळवारी मध्यरात्री साडे बारा वाजता शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले. तहसीलदार अमोल निकम यांनी स्वत:च फिर्याद दिली.
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२९ : निवडणुकीच्या कामकाजास टाळाटाळ करणा-या जळगाव तालुक्यातील ६९ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याविरुध्द मंगळवारी मध्यरात्री साडे बारा वाजता शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले. तहसीलदार अमोल निकम यांनी स्वत:च फिर्याद दिली.
मतदार यादीतचे विशेष संक्षिप्त पुन:निरीक्षण या कार्यक्रमातंर्गत १५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी बीएलओ यांना बंधनकारक होती, मात्र या प्रक्रीयेत त्यांनी जबाबदारी पार न पाडता टाळाटाळ केल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिका-यांनी अशा बीएलओंविरुध्द कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते.
जळगाव तालुक्यातील ५६० बीएओ यांनी कामकाज करणे बंधनकारक असताना ६९ अधिका-यांनी आपली जबाबदारी टाळल्याने तहसीलदार अमोल निकम यांनी मंगळवारी या बीएलओंविरुध्द शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. काही दिवसांपूर्वी धरणगाव तालुक्यातीलही बीएलओंविरुद्ध गुन्हे दाखल झाले होते. आता जळगाव तालुक्यातील बीएलओंविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
गुन्हे दाखल झालेले बीएलओ पुढील प्रमाणे
मो.जहीर अ. कदीर , रमेश राजाराम पाटील , सुनील हरी बाविस्कर , किरण शिवदास बाविस्कर , अशोक लोटू बोरोले , वेदप्रकाश श्रीराम गडदे , राजेंद्र सावळेराम दिवे , योगेश सुपडू भालेराव , नरेंद्र बापुराव पालवे, आर.पी.पवार , वाय.पी.पाटील, राजेंद्र चिमणराव देशमुख ,सिध्दार्थ चिंधू भालेराव , नितीन सुधाकर चौक , संदीप कुमार बांगर , नितीन विक्रम सोनवणे, भगवान तापीराम पारी, ए.पी.सोनवणे, अनिल दादाभाऊ शितोळे , विलास भाऊराव पाटील ,मोतीराम सोमा भोये , प्रमोद पी.पाटील, विनोद सुधारक भोलाणे, बापू नाना पाटील , साहेबराव फकीरा बागुल , अ.वादीद इमाम अन्सारी , गोविंद श्रीकृष्ण चौधरी , गजानन पांडूरंग वाणी , शुभम रमेश गजभिये , राजेंद्रसिंग शिवाजी पाटील , राजकुमार कोटूमल नागराणी, मनोज देवचंद सोनार, राजेंद्र विठ्ठल उमाळे, निळकंठ खडके, किरण भास्कर भोळे, कैलास चिंतामण सोनार, मो.अयुब मो.युसुफ, प्रमोद नरसिंगराव सुर्वे, अजय एस.ब-हाटे, शालिक चिंधू तायडे, एस.बी.धबाळे, एस.व्ही.जंगले, राहूल शिवाजी पवार, एम.पी.भदाणे, चेतन अशोक सोनवणे, मनोहर भजनलाल तेजवाणी, महेंद्र आत्माराम बेलदार, लक्ष्मण मोतीराम पाटील, संदीप विकास भावसार, अरुण नामदेव वाणी, आसीफ जब्बार फारुखी, पी.एस.जाधव, राजेंद्र देवराम कोळी, नितीन सुरेश चौधरी, जावेद जहीर खान तडवी, गणेश पंढरीनाथ वानखेडे, किशोर लक्ष्मण अटवाल, पंडित कोडाजी पवार, शशिकांत लक्ष्मण भामरे, शिवाजी भाऊलाल पाटील, नारायण ओंकार सपकाळे, सतीश नामदेव घुगे , कैलास भरत पाटील, चंद्रकांत पंढरी पाटील, संदीप त्र्यंबक रोकडे, शेख मुस्तफा खलील, जी.डी.काळे, परमार रहीम तडवी, मनिष रामदास पाटील यांच्याविरुध्द लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० चे कलम ३२ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.