पाडवींविरुद्ध एफआयआर!
By admin | Published: June 12, 2016 12:52 AM2016-06-12T00:52:26+5:302016-06-12T00:52:26+5:30
विहिरींचा घोटाळा : जि.प. सीईओंचे निर्देश
Next
>विशेष केंद्रीय साहाय्य योजनेअंतर्गत विहीर योजनेत एस.आर. पाडवी या अधिका:याने शिक्क्याचा दुरुपयोग करून प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्याचे निर्देश जि.प. सीईओ जी.सी. मंगळ यांनी दिले आहेत. या योजनेसाठी दोन कोटी 77 लाख 50 हजार रुपयांचा निधी खर्च झाला. प्रत्यक्षात मात्र योजना राबविली गेलीच नाही. पाडवी यांनी कृषी अधिकारी (रोहयो) पदावर असताना जिल्हा कृषी विकास अधिकारी यांच्या शिक्क्याचा दुरुपयोग करून संबंधित रक्कम बँकेतून परस्पर काढून घेतल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच सीईओंनी आदिवासी विकास प्रकल्पाला निर्देश दिले आहेत.