वारंवार सूचना देऊनही गैरहजर राहणाऱ्या शासकीय रुग्णालयातील दोन डॉक्टर्सवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 11:14 PM2020-06-08T23:14:50+5:302020-06-08T23:15:32+5:30

दोन्ही डॉक्टर कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून गैरहजर होते. वारंवार सूचना देऊनही ते हजर न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FIR against two doctors of a government hospital who were absent despite instructions | वारंवार सूचना देऊनही गैरहजर राहणाऱ्या शासकीय रुग्णालयातील दोन डॉक्टर्सवर गुन्हा

वारंवार सूचना देऊनही गैरहजर राहणाऱ्या शासकीय रुग्णालयातील दोन डॉक्टर्सवर गुन्हा

Next

जळगाव : कोविडसारख्या महामारीतही वारंवार सूचना देऊनही गैरहजर राहणारे जळगावच्या शासकीय  वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वरिष्ठ निवासी डॉ़ सचिन रवींद्र सरोदे व सहाय्यक प्राध्यापक डॉ़ रोहन अशोक पाटील या दोन डॉक्टरांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात  आला आहे़ 
रुग्णालयातील कार्यालयीन अधीक्षक मन्साराम महाले यांच्या फिर्यादीवरून सोमवारी  रात्री दहा वाजेच्या सुमारास हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ हे दोन्ही डॉक्टर कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून गैरहजर होते. वारंवार सूचना देऊनही ते हजर न झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: FIR against two doctors of a government hospital who were absent despite instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.